- जान्हवी किल्लेकर थायलंडहून थेट तिच्या मुळ गावाला कोकणातील रायगड जिल्ह्यातील मुरूड जंजिरा येथे पोहोचली आहे
- तिने गावी पोहोचल्यावर प्रथम समुद्रातील मच्छी, सुकी मासळी आणि मोठा हलवा खरेदी केला आहे
- जान्हवीला सोडे हा महाग पण आवडता कोकणी पदार्थ असून तिने वाडीतल्या सुपाऱ्या ही गोळा केल्या.
Jahnavi Killekar: जान्हवी किल्लेकर ही नेहमी चर्चेत असते. ती सोशल मीडियावर ही चांगलीच सक्रीय असते. ती कुठेही गेली की त्याची माहिती तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून चाहत्यांना मिळते. नुकतीच ती थायलंडला गेली होती. तिथले बोल्ड फोटो तिने तिच्या सोशल मीडियावर शेअर केले होते. त्या आधी ती बिग बॉस मधील तिचा सहकारी सूरज चव्हाण याच्या लग्नात ती दिसली. पण थायलंडवरून आल्यानंतर ती एका खास ठिकाणी गेली आहे. तिथं तिला एक भन्नाट काम मिळालं आहे. ते काम करताना तिने खास व्हिडीओ ही बनवले आहेत. ते तिने चाहत्यांसाठी शेअरही केले आहेत.
जान्हवी किल्लेकर ज्या खास ठिकाणी गेली आहे ते दुसरे तिसरे काही कोणते नसून तिचे मुळ गाव आहे. तिचे मुळ गाव कोकणात आहे. ते ही रायगड जिल्ह्यातील मुरूड जंजिरा आहे. ती थायलंड वरून थेट आपल्या गावी पोहोचली. गावी गेल्यावर सर्वात पहिले काम जर तिने काही केलं असेल तर ते म्हणजे समुद्राची मच्छी खरेदी करण्याचे. त्याच बरोबर तिने सुकी मासळी ही विकत घेतली. बाजारपेठेत गेल्यानंतर ओळखीच्या कोळणींकडे ती गेली. तिथे तिने मोठा हलवा विकत घेताला. तो तिचा फेवरेट मासा आहे असं तिने आपल्या व्हिडीओत सांगितलं. त्यानंतर तिचा मोर्चा वळला तो थेट सुकी मासळी खरेदी करण्याकडे.
समुद्राच्या माशांसोबतच तिला सुकी मासळी ही खूप आवडते. सोडे हा तिचा फेवरेट पदार्थ. हा महाग असतो असं ती व्हिडीओत सांगते. पण तो तिला खूप आवडतो. त्या शिवाय तिने घरी घेवून जाण्यासाठी जवला ही विकत घेतला. तो घेण्या आधी तो चांगला आहे की हे तिने आवर्जून चेक केले. त्यानंतरच तो विकत घेतला. सेलिब्रेटी असल्याने आरोआप तिला डिस्काऊंट ही दिलं गेलं असं ही तिने सांगितलं. ते झाल्यानंतर तिने तिच्या घराकडे मोर्चा वळवला. त्यानंतर तिने आणखी एक व्हिडीओ बनवला आहे. त्यात ती अगदी कोकणी मुली सारखी काम करत असताना दिसतेय.
ती या व्हिडीओत म्हणते ही आमची वाडी. वाडी म्हणजे नारळी पोफळीची झाडे असलेली वाडी. या वाडीत ती चक्क खाली पडलेल्या सुपाऱ्या गोळा करते. एक एक वेचत ती संपूर्ण टोपली सुपाऱ्यांनी भरते. आपलं हे नवं काम असं ही ती सांगते. मला आणि माझ्या सासूबाईंना वाडीत फेरफटका मारण्यासा आवडते. आम्ही दोघी फेरफटका मारतो. इथल्या सुपाऱ्या गोळ्या करतो. त्यानंतर त्या उन्हात सुकवतो. त्या सुकल्यानंतर त्या फोडतो. गावी आल्यावर हे सर्व काम करायला आपल्याला खूप आनंद मिळतो असं ही ती या व्हिडीओत सांगते. चाहत्यांनी ही कमेंटमध्ये तिच्या या नव्या कामाचे कौतूक केले आहे.