जाहिरात

भारतीय चित्रपटांवर बंदी..पाकिस्तानात Dhurandhar ला का मिळतेय पसंती? अभिनेता म्हणाला, 'आम्ही मुस्लिमांना..'

रणवीर सिंग स्टारर चित्रपट ‘धुरंधर’ बॉक्स ऑफिसवर प्रचंड गाजला असून दिवसेंदिवस अनेक विक्रम मोडत आहे. अशातच एका अभिनेत्यानं पाकिस्तानच्या मुस्लीम समजाबाबत मोठं विधान केलं आहे.

भारतीय चित्रपटांवर बंदी..पाकिस्तानात Dhurandhar ला का मिळतेय पसंती? अभिनेता म्हणाला, 'आम्ही मुस्लिमांना..'
Pakistani Reaction On Dhurandhar

Dhurandhar Movie Latest News : रणवीर सिंग स्टारर चित्रपट ‘धुरंधर' बॉक्स ऑफिसवर प्रचंड गाजला असून दिवसेंदिवस अनेक विक्रम मोडत आहे. आदित्य धर यांच्या दिग्दर्शीत या चित्रपटाचा स्पाय थ्रिलर कराचीच्या ल्यारी टाऊनमधील गँग्सवर आधारित आहे.‘धुरंधर' रिलीज झाल्यापासून भारतात ₹600 कोटींपेक्षा जास्त कमाई झाली असून जगभरात ₹900 कोटींचा टप्पा पार केला आहे. आता ‘धुरंधर'मधील कलाकार नवीन कौशिक यांनी पाकिस्तानी प्रेक्षकांच्या प्रतिक्रियांवर स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे. अभिनेते नवीन यांनी या चित्रपटात ‘डोंगा'ची भूमिका साकारली आहे. 

"भारतावर हल्ल्यासारखी परिस्थिती.."

एका मुलाखतीत नवीन कौशिक म्हणाले की, पाकिस्तानमधून येणाऱ्या कमेंट्सवरून हे स्पष्ट होते की, तिकडच्या लोकांनी या चित्रपटाला पसंती दर्शवली आहे. कारण यात चित्रपटात त्यांच्या देशाचा किंवा मुस्लीम समाजाचा अपमान केला नाही.नवीन यांनी म्हटलंय, “पाकिस्तानी प्रेक्षकांनी हे लक्षात घेतले आहे की चित्रपटात आम्ही तिथल्या लोकांना किंवा मुस्लिम कम्युनिटीला शिवीगाळ केलेली नाही.आम्ही फक्त त्या भ्रष्ट लोकांना दाखवले आहे,जे सिस्टीमचा गैरफायदा घेतात आणि भारतावर हल्ल्यासारखी परिस्थिती निर्माण करतात.” त्यांनी पुढे सांगितले की पाकिस्तानी प्रेक्षक मान्य करत आहेत की,असे लोक त्यांच्या देशालाही नुकसान पोहोचवत आहेत. म्हणूनच ते चित्रपटाला पसंती दर्शवत आहेत.

नक्की वाचा >> पुण्याच्या मित्रासाठी कायपण! अमेरिकेहून 12800 किमीचा प्रवास केला, कारण काय? video पाहून थक्क व्हाल

‘धुरंधर' 2025 चा सर्वात हिट चित्रपट 

चित्रपटात रणवीर सिंगसोबत अक्षय खन्ना,अर्जुन रामपाल,संजय दत्त,आर.माधवन आणि राकेश बेदी यांसारखे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. पाकिस्तानमध्ये भारतीय चित्रपटांवर बंदी असतानाही अनेक लोक हा चित्रपट पाहत आहेत आणि सोशल मीडियावर आपली मते शेअर करत आहेत. काहींनी याला उत्तम चित्रपट म्हटले, तर काहींनी त्यातील चित्रणावर प्रश्न उपस्थित केले. पण एकूणच चित्रपट सीमापारही चर्चेचा विषय बनला आहे. ‘धुरंधर' 2025 मधील सर्वात मोठा हिट ठरला असून याचा दुसरा भाग लवकरच येणार आहे.चित्रपटाचा दुसरा भाग किती सुपरहिट होतो,हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

नक्की वाचा >> सीक्रेट सँटा नव्हे, हे तर सीक्रेट Swiggy, कोणी केली 1 लाख रुपयांच्या कंडोमची ऑर्डर? काय काय मागवलं? पाहा यादी

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com