Bollywood News: 40 भाकऱ्या, दिड लीटर दुध! 'हा' अभिनेता आजही पार्टीनंतर घरी आल्यावर घेतो घरचं जेवण

आजही त्यांला घरचे बनवलेले जेवण आवडते. दुधाशिवाय त्यांचा दिवस क्वचितच संपतो.

जाहिरात
Read Time: 2 mins

बॉलिवूड अभिनेते त्यांच्या डाएट आणि फिटनेसमुळे नेहमीच चर्चेत असतात. पण एक असा अभिनेता आहे ज्याला पोटभरून जेवणं अधिक पसंत आहे. त्याची ती सवयचं असल्याचं ही तो सांगतो. या अभिनेत्याचं नावा आहे,  जयदीप अहलावत.जयदीपला दुध, तूप आणि त्या बरोबर भाकरी खाण्याची आवड आहे. जयदीप तो त्याच्या लहनपणीच्या या सवयी बाबत भरभरून सांगतो. ते दिवस आठवले की हायसे वाटते. शिवाय या आहारामुळे शरीर संतूलीत राहात असल्याचं ही तो सांगतो.  

जयदीप यांनी "खाने में कौन है" या यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, "2008 पर्यंत, त्याचे वजन 70 किलोपेक्षा जास्त नव्हते. तो सांगती माझी उंची जास्त आहे. तरी माझं वजन 70 किलो होते. तो सांगतो  मी दिवसाला किमान 40 भाकऱ्या खात असे, कारण तुम्ही खातानाच सर्व वजन आणि कॅलरीज बर्न करत असता असं ही त्यांना यावेळी बोलताना सांगितलं.जयदीप हा हरियाणातील एका गावात लहानाचा मोठा झाला. 

नक्की वाचा - Alia Bhatt News: आलिया भट्टची लाखोंची फसवणूक, माजी PA ला बंगळुरूतून अटक

दुपारचे जेवण टाळून तो थेट शेतातून ऊस, गाजर, पेरू किंवा त्या हंगामात जे काही असेल ते खात असत. तो पुढे सांगतो की "सकाळी आम्ही चणा किंवा बाजरीची भाकरी किंवा मिस्सी रोटी लस्सी, लोणी, चटणीसोबत खात होतो. बस एवढेच आणि त्यानंतर आम्ही रात्रीचे जेवण करत असत. दुपारचे जेवण तयार असायचे पण विचार असा होता की जर कोणाला भूक लागली तर तो खाईल, पण असे होत नव्हते अशी त्यावेळीची आठवण त्याने सांगितली आहे. 

जयदीप यांनी सांगितले, "दूध माझ्या आहाराचा एक महत्त्वाचा भाग होता," पुढे तो सांगतो की  "दूध माझ्या आयुष्याचा आणि आहाराचा असा भाग होता, ज्याशिवाय माझा एकही दिवस जात नव्हता. दिवसातून किमान तीन वेळा अर्धा लिटर दूध तो पीत होत होता.  तेव्हा आम्हाला ग्लासात दूध पिण्याची परवानगी नव्हती. एकतर लोट्यात किंवा जगमध्ये आम्हाला दूध दिलं जात होतं असं ही त्याने यावेळी सांगितले. 

Advertisement

नक्की वाचा - Prarthana Behre: 'सखे गं साजणी' चित्रपटाचं पोस्टर आलं समोर, कलाकारांची नाव मात्र गुलदस्त्यात

आजही त्यांला घरचे बनवलेले जेवण आवडते. दुधाशिवाय त्यांचा दिवस क्वचितच संपतो. तो सांगतो, "मी 15-16 वर्षांपासून मुंबईत आहे.  मला अजूनही घरचे बनवलेले जेवण आवडते. मी एखाद्या पार्टीत गेलो तरी घरी येऊन घरचे बनवलेले जेवण खातो. तसं केलं नाही तर जेवण केलं असं वाटत नाही. जे लहान पणी गोष्टी पाळल्या होत्या त्याच आताही अभिनय क्षेत्रात आल्यानंतर ही पाळत असल्याचं त्याने आवर्जून सांगितलं.