जाहिरात

Alia Bhatt News: आलिया भट्टची लाखोंची फसवणूक, माजी PA ला बंगळुरूतून अटक

Mumbai Crime News : वेदिका शेट्टी हिने 2021 मध्ये आलिया भट्टची पीए म्हणून काम करण्यास सुरुवात केली होती आणि 2024 पर्यंत ती आलियासोबत राहिली.

Alia Bhatt News: आलिया भट्टची लाखोंची फसवणूक, माजी PA ला बंगळुरूतून अटक

Mumbai News : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट हिची (Alia Bhatt) माजी पीए वेदिका प्रकाश शेट्टी हिने फसवणूक केल्याचं प्रकरण समोर आलं आहे. याप्रकरणी वेदिका हिला पोलिसांकडून फसवणुकीच्या गंभीर आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. तिच्यावर लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे, ज्यामुळे बॉलिवूड वर्तुळात खळबळ उडाली आहे.

आलिया भट्टची माजी पीए वेदिका प्रकाश शेट्टी हिला मुंबईच्या जुहू पोलिसांनी अटक केली आहे. वेदिका शेट्टीवर आलियाच्या Eternal Sunshine Productions Pvt Ltd कंपनी आणि तिच्या वैयक्तिक खात्यांमधून एकूण 76 लाख 90 हजार 892 रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. 

(नक्की वाचा-  Kapil Sharma: कपिल शर्मानं कॅनडामध्ये उघडले रेस्टॉरंट, पहिल्याच दिवशी काय घडलं? पाहा Video)

आलिया भट्टच्या आईने दाखल केली तक्रार

फसवणुकीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर आलिया भट्टची आई आणि प्रॉडक्शन हाऊसच्या संचालक सोनी राजदान यांनी 23 जानेवारी 2025 रोजी जुहू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. ही  फसवणूक मे 2022 ते ऑगस्ट 2024 दरम्यान झाली होती. तक्रारीनंतर भारतीय न्याय संहितेच्या कलम 316 (4) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहेत. 

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वेदिका शेट्टी हिने 2021 मध्ये आलिया भट्टची पीए म्हणून काम करण्यास सुरुवात केली होती आणि 2024 पर्यंत ती आलियासोबत राहिली. या काळात, तिला अनेक आर्थिक व्यवहारांबाबतचे अधिकार देण्यात आले होते. पोलीस तपासात असे दिसून आले आहे की, वेदिका शेट्टीने बनावट बिले बनवली आणि आलियाला त्यावर स्वाक्षरी करायला लावली. हे खर्च आलियाच्या प्रवास, बैठका आणि इतर कार्यक्रमांशी संबंधित आहेत असे सांगून ती तिची दिशाभूल करायची. 

(नक्की वाचा - Who is Babydoll Archi: आसामच्या 'बेबी डॉल आर्चीची का होतेय चर्चा? पॉर्न स्टारसोबतच्या त्या फोटोने घातला धुमाकूळ)

वेदिका शेट्टीने ऑनलाइन टूल्स वापरून ही बिले डिझाइन केली जेणेकरून ती खरी वाटतील. आलियाने या बिलांवर स्वाक्षरी केल्यानंतर, संबंधित रक्कम तिच्या जवळच्या मित्राच्या खात्यात हस्तांतरित करण्यात आली, ज्याने नंतर संपूर्ण रक्कम शेट्टीला परत केली. तक्रारीनंतर तक्रार शेट्टी फरार झाली होती.  जुहू पोलिसांच्या पथकाने तिला बंगळुरूहून ताब्यात घेतले आणि पाच दिवसांच्या ट्रान्झिट रिमांडवर मुंबईत आणले.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com