Janhvi Kapoor : श्रीदेवीची लेक होणार माजी मुख्यमंत्र्यांच्या घरची सून? नव्या फोटोनं चर्चेला उधाण

Janhvi Kapoor Boyfriend : दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीची लेक जान्हवी कपूर तिच्या रिलेशशिपमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीची लेक जान्हवी कपूर तिच्या रिलेशशिपमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून जानव्हीचं नाव शिखर पहाडियाशी जोडलं जात आहे. शिखर माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू आहे. फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रानं त्याच्या घरी नुकतीच दिवाळी पार्टी दिली. त्या पार्टीमध्येही हे दोघं एकत्र उपस्थित होते. स्वत: मनिषनं इन्स्टाग्रामवर या पार्टीमधील खास फोटो शेअर केले आहेत. त्यामधील एका फोटोमध्ये मनिष मल्होत्रा, जानव्ही कपूर तिचा कथित बॉयफ्रेंड शिखर पहाडिया, अनन्या पांडे आणि सुहाना खान एकत्र दिसत आहेत. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

या सर्वांचा प्रसन्न मुडमधील फोटो पाहून सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस पडलाय. जान्हवी कपूर आणि शिखरच्या नात्यांबाबतही त्यामुळे चर्चा सुरु झालीय. 37 वर्षांचा शिखर हा उद्योगपती आहेत. जान्हवी आणि शिखर गेल्या काही महिन्यांंमध्ये अनेक पार्ट्यांमध्ये एकत्र दिसले आहेत.

Advertisement

 जान्हवीला कसा हवा जोडीदार? 

मिस्टर अँड मिसेस माही या सिनेमाच्या प्रमोशनच्या वेळी जान्हवीनं तिला कसा जोडीदार हवा याबाबद्दल सांगितलं होतं. त्यावेळी व्हायरल झालेल्या व्हिडिओनुसार 'माझ्या स्वप्नांना जो आपलं मानेल. मला आनंद देईल, बरोबरीनं वागवेल, माझ्या पाठीशी उभा राहिल, मला हसवेल आणि मी रडत असतानाही माझ्या सोबत असेल, असा जोडीदार हवा असल्याचं जान्हवीनं सांगितलं होतं. 

( नक्की वाचा : घटस्फोटाच्या चर्चेमध्ये या अभिनेत्रीशी जोडलं जातंय अभिषेकचं नाव, लग्नाच्या प्लॅनवर तिनं दिलं उत्तर! )

जान्हवीनं तिचं मनोगत संपवताच प्रेक्षकांनी 'ऑल द बेस्ट' म्हणत तिला शुभेच्छा दिल्या. त्यावर ऑल द बेस्ट का? या प्रकारचा जोडीदार मिळणं अवघड आहे का? असा प्रश्न जान्हवीनं विचारला. त्यावर 'तू तो यापूर्वीच शोधला आहेस,' असं उत्तर प्रेक्षकांनी दिलं. प्रेक्षकांचे हे शब्द ऐकताच जान्हवी लाजली आणि तिनं डोळे मिचकावले. 

चित्रपट दिग्दर्शक करण जोहर होस्ट असलेल्या 'कॉफी विथ करण' या कार्यक्रमात मी शिखरला प्रेमाने 'शिखू' म्हणते हे सिक्रेट जान्हवीनं शेअर केलं होतं. 

Advertisement

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world