Suraj Chavan: 'मी आत्या होणार' म्हणत जान्हवी किल्लेकरने शेअर केला भन्नाट व्हिडीओ, पाहा संजनाचे डोहाळे जेवण

सूरज चव्हाण यांनी आपली मामाची मुलगी संजना गोफणे हिच्या सोबत लग्न केले आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

मराठी बिग बॉसनंतर प्रसिद्धी झोतात आलेल्या सूरज चव्हाणच्या घरी आता नवा पाहुणा येणार आहे. त्याच्या घरी सध्या आनंदाचे वातावरण आहे. सूरजची सहकलाकार जान्हवी किल्लेकर हिने ही खुशखबरी दिली आहे. तिने सूरजची पत्नी संजनाच्या डोहाळे जेवणाला हजेरी लागली. त्यावेळी तिने एक व्हिडीओ तयार केला आहे. त्यात ती मी आत्या होणार असं सांगत आहे. शिवाय सूरज आणि संजना यांना आपल्या जवळ घेत आशिर्वाद ही देत आहे. त्यात कुणी तरी येणारं येणारं गं असं बॅग्राऊंडला गाणं ही वाजत आहेत. या व्हिडीओत सूरज आणि संजना हे खूश दिसत आहेत. 

बिग बॉसमध्ये सूरज आणि जान्हवी यांची ओळख झाली. त्यानंतर त्यांची मैत्री घट्ट होत गेली. सूरजचा साधे पण जान्हवीला भावला होता. तिने प्रत्येक गोष्टीत त्याला साथ देण्याचं ही सांगितलं होतं. ती सूरजला आपला भाऊ मानते. त्यानुसार सुरजच्या लग्नात जान्हवी करवली म्हणून मिरवताना ही आपल्याला दिसले. तिचे व्हिडीओ ही त्यावेळी चांगलेच व्हायरल झाले होते. सूरजच्या लग्नाला ती त्याच्या गावी तळ ठोकून होती. प्रत्येक कार्यक्रम आणि विधीत ती ठळक पणे दिसत होती. बिग बॉसचे काही मित्र उशिराने आले. पण जान्हवी मात्र पहिल्या पासून शेवट पर्यंत सूरज सोबत होती. 

Advertisement

नक्की वाचा - Facebook Down: फेसबुक अन् इंस्टाग्राम अचानक ठप्प का झालं? कारण आलं समोर, लाखो युजर्सना मोठा फटका

आता सूरजच्या घरी पुन्हा एकदा आनंदाची बातमी आहे. सूरजची पत्नी संजना गर्भवती आहे. तिचे डोहाळे जेवण नुकतेच पार पडले. या कार्यक्रमालाही जान्हवीने आपली उपस्थिती दाखवली. शिवाय तिने एक भन्नाट व्हिडीओ ही आपल्या इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. त्यावर जान्हवी आणि सूरजच्या चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात लाईक्स केले आहे. शिवाय दोघांचे अभिनंदन आणि शुभेच्छा ही दिल्या आहेत. या व्हिडीओत जान्हवी गुलाबी रंगाच्या साडीत सूरज आणि संजना यांच्यासोबत दिसत आहे. 

नक्की वाचा - Sachin Tendulkar: सचिन खेळला विमानात क्रिकेट, लेकी- सुनेनं केली बॉलिंग, विकेट कुणी घेतली? पाहा Video

सूरज चव्हाण यांनी आपली मामाची मुलगी संजना गोफणे हिच्या सोबत लग्न केले आहे. 25 नोव्हेंबर 2025 ला हा लग्न सोहळा मोठ्या थाटमाटात पार पडला होता. या लग्नाची चर्चा राज्यभर झाली होती. लग्ना आधी सूरज बिग बॉस विजेता झाला होता. त्यामुळे त्याचा चाहता वर्ग संपूर्ण महाराष्ट्रात पसरला होता. आता सूरज बाप होणार आहे. ही गोष्ट संजना आणि सूरज यांच्यासाठी आनंदाची आहे. सूरजच्या कुटुंबीयांसाठी ही आनंदाची आहे. या आनंदात सूरजची जवळची मैत्रिण आणि मानलेली बहीण जान्हवी किल्लेकरही सहभागी झाली होती.