Javed Akhtar Ghajhal: भारतीय चित्रपटसृष्टीत संगीतला अढळ स्थान आहे. संगीत जगताच्या इतिहासात अशी अनेक गाणी तयार झाली ज्यांनी अनेक दशके रसिकांना भुरळ घातली. असेच एक गाणे, गझल 44 वर्षांपूर्वी प्रदर्शित झाली होती. इतकी वर्ष उलटूनही त्या गाण्याची क्रेझ, लोकप्रियता आजही कायम आहे. ही गझल जावेद अख्तर यांनी लिहिली असून ती १९८२ सालच्या 'साथ साथ' या चित्रपटात होती. ही गझल फारुख शेख आणि दीप्ती नवल यांच्यावर चित्रित करण्यात आली होती. गाण्याचे बोल, व्हिडिओ आणि संगीत हे सर्व खरोखरच उत्कृष्ट आहेत, पण तिच्या निर्मितीमागील कहाणी, जी खुद्द जावेद अख्तर यांनी सांगितली आहे, ती त्याहूनही भन्नाट आहे.
"9 पॅग लावून 9 मिनिटात लिहलं गाणं"
जावेद अख्तर यांनी गायलेली ही अजरामर गझल म्हणजे "तुमको देखा तो ये खयाल आया". जावेद अख्तर यांनी खुलासा केला की त्यांनी ही गझल पूर्णपणे नशेत असताना लिहिली होती. फिक्की कोलकाता येथील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी ही कहाणी सांगितली. ते म्हणाले की "सिलसिला'नंतर, यश चोप्रांचा एक सहाय्यक दिग्दर्शक आला आणि त्याने मला त्याच्या चित्रपटासाठी एक गाणे लिहिण्याची विनंती केली. बजेट जास्त नव्हते, पण मी होकार दिला."
पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की "त्या दिवसांत मी खूप प्यायचो. तो बिचारा सहाय्यक दिग्दर्शक रडत येऊन मला गाण्याबद्दल विचारायचा. आम्ही पहाटे २ वाजेपर्यंत बसून, पीत-पीत गप्पा मारायचो आणि ते गाणे रोज पुढे ढकलले जायचे. एके दिवशी जेव्हा त्याने मला गाण्याबद्दल विचारले, तेव्हा पहाटेचे साधारण २ वाजले होते. मी आधीच ८-९ पेग प्यायलो होतो. मी कागद आणि पेन मागितला आणि ९ मिनिटांत गाणे संगीतबद्ध करून त्याला दिले. त्यानंतर जगजीत सिंग यांनी ते गाऊन अजरामर केले."
Prithvi Shaw: साखरपुड्यानंतर काही महिन्यांतच मोडलं पृथ्वी शॉचं लग्न? वाचा का सुरू झालीय चर्चा...
दरम्यान, जावेद अख्तर यांनी स्पष्ट केले की, त्यांनी ते गाणे ९ मिनिटांत लिहिले कारण त्या सहाय्यक दिग्दर्शकाला त्याची शेवटची ट्रेन पकडायची होती. तो सतत घड्याळाकडे पाहत होता. मी पटकन गाणे लिहिले आणि त्याला दिले. दरम्यान, आजही ही गझल प्रचंड लोकप्रिय असून रसि प्रेक्षकांना नेहमीच भुरळ घालत असते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world