Sairat Actor Arbaaj Shaikh VIDEO: सैराटमध्ये सल्या म्हणजेच सलीम शेखची भूमिका करणाऱ्या अरबाज शेखचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अभिनेता अरबाज शेख ने आर्थिक अडचणीत असल्याचं सांगत मदतीची मागणी केली आहे. सोलापूरमध्ये एका रुग्णालयात त्याच्या वडिलांवर उपचार सुरु असून रुग्णालयाकडून मनमानी सुरु असल्याचा आरोप करत अरबाजने मदतीची मागणी केली आहे.
नेमकं काय म्हणाला अरबाज शेख?
"मी अरबाज शेख, माझ्या वडिलांना ब्रेन हॅमरेज झाले त्यामुळे त्यांना आम्ही आठ दिवसांपूर्वी सोलापुरातल्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं होतं. त्यांचा हार्टचा प्रॉब्लेम झाला म्हणून आम्ही नोबेलला शिफ्ट केले होते. मात्र आम्हाला नोबेल हॉस्पिटलचा अनुभव फारच वाईट आला. मी पेशंटला इथे ऍडमिट केलं तेव्हा त्यांनी दहा हजार रुपये डिपॉझिट भरायला सांगितले होते, जे आम्ही भरले. त्यानंतर त्यांनी आम्हाला काही गोळ्यांचे प्रिस्क्रिप्शन दिले. आम्ही त्यांना त्या गोळ्या बाहेरून आणून देतो असं सांगितलं पण त्यांनी त्यास नकार दिला आणि हॉस्पिटलच्याच मेडिकल मधून आणून द्यायला सांगितलं. काही इंजेक्शन असतील ते सुद्धा इथूनच घ्यावे लागतील असे सांगण्यात आल्याचा दावा त्याने केला आहे.
Prithvi Shaw: साखरपुड्यानंतर काही महिन्यांतच मोडलं पृथ्वी शॉचं लग्न? वाचा का सुरू झालीय चर्चा...
तसेच "मी हॉस्पिटलच्या मेडिकलमधून गोळ्या घेतल्या तेव्हा त्याची 40 हजाराच्या वर किमत झाली. त्या गोळ्या त्यांनी मला तीन वेळा आणायला सांगितल्या. यांनी मला त्यांच्याच मेडिकलमधून औषध घेण्यासाठी जबरदस्ती केली. या आधी आम्ही जेव्हा पप्पांना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलेलं तेव्हा तिथे आम्हाला असं आढळलं नाही. तेव्हा मला याच गोळ्या बाहेरून जवळपास अर्धा किमतीत मिळायच्या म्हणजे 40 हजाराच्या गोळ्या मी 20 हजारांना आणायचो. पण इथे नुसती लूट होत आहे. माझ्या बापाला मला मरताना बघायचं नाहीये. त्यामुळेच मी त्यांना नोबेल हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्याचा निर्णय घेतला पण इथे मला खूप वाईट अनुभव आल्याचे अरबाजने सांगितले आहे.
आर्थिक मदतीची केली मागणी
दरम्यान, आत्ता मी खूप आर्थिक अडचणीत आहे पण तरीही माझ्या वडिलांचा treatment सुरू ठेवणं खूप गरजेचं आहे. Google pay no - 8888515473/+91 95956 18110 तुम्हा सगळ्यांना विनंती आहे, ज्यांना शक्य असेल त्यांनी थोडीशी आर्थिक मदत करावी किंवा हा post जास्तीत जास्त share करावा. तुमची छोटी मदत माझ्यासाठी खूप मोठी ठरेल, असं आवाहनही त्याने केले आहे.
Shocking news: रोहित शेट्टी खंडणी प्रकरणाचे थेट पाकिस्तान कनेक्शन समोर? तपासात पोलिस ही चक्रावले
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world