बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रणौत (Kangana Ranaut) सध्या एमरजन्सी या आपल्या आगामी चित्रपटासाठी चर्चेत आहे. हा चित्रपट सहा सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार होता, परंतु वादामुळे याच्या रिलिजवर आक्षेप नोंदविण्यात आला आहे. याशिवाय चित्रपटांना दिलं जाणारं सर्टिफिकेटही थांबवण्यात आलं होतं, मात्र आता चित्रपटाला सर्टिफिकेट मिळालं आहे. आता लवकरच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची नवी तारीख समोर येईल.
दरम्यान, कंगना रणौतशी संबंधित एक वृत्त समोर आलं आहे. ज्यामुळे अनेकजणं हैराण झाले आहेत. कंगनाने नुकतच वांद्रे पाली हिल येथील भव्य बंगला विकला आहे. कंगनाच्या याच बंगल्याच्या काही भागावर चार वर्षांपूर्वी 2020 मध्ये बीएमसीने बुलडोजर चालवला होता. गेल्या महिन्यात कोड इस्टेट नावाच्या युट्यूब पेजने एक व्हिडिओ अपलोड केला होता. त्यानंतर कंगनाने बंगला विकल्याची चर्चा सुरू झाली आहे.
ज्यानुसार, एका प्रोडक्शन हाऊसचं ऑफिस विकणे आहे.. त्यावेळी कुणाचंही नाव देण्यात आलं नव्हतं. मात्र व्हिडिओमध्ये तो बंगला कंगनाचा असल्याचं दिसत होतं.
नक्की वाचा - Kandahar Hijack आधारित वेब सीरिज 'IC 814'मध्ये दहशतवाद्यांना हिंदू नावं का दिली?
कंगना रणौतने विकला आलीशान बंगला...
अनेक सोशल मीडिया वापरकर्त्यांनी हा बंगला कंगनाचा असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्या व्हिडिओमधील माहितीनुसार, तो परिसर एकूण 285 स्क्वेअर मीटर आहे. यात 3042 स्क्वेअर फुटात बंगला आहे आणि 500 स्क्वेअर फुटात पार्किंग आहे. दोन मजली बंगल्याची किंमत 40 कोटी असल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र हा बंगला 32 कोटींना विकला गेला. त्यामुळे कंगनाला आठ कोटींचं नुकसान सहन करावं लागलं. आता कंगनाने नुकसान होत असतानाही बंगला का विकला, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
मुंबईतील याच बंगल्यावर चार वर्षांपूर्वी काही भाग अवैध असल्याचं सांगत बुलढोझर चालविण्यात आला होता. बीएमसीने बेकायदा बांधकामाचा हवाला देत बंगल्याचा काही भाग पाडला होता. त्यानंतर 9 सप्टेंबर रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या स्थगिती आदेशामुळे घर पाडण्याचे काम थांबवण्यात आले होते.