जाहिरात

Kandahar Hijack आधारित वेब सीरिज 'IC 814'मध्ये दहशतवाद्यांना हिंदू नावं का दिली?

अपहरणकर्त्यांची नावं बदलून हिंदू ठेवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Kandahar Hijack आधारित वेब सीरिज 'IC 814'मध्ये दहशतवाद्यांना हिंदू नावं का दिली?
मुंबई:

चित्रपट निर्माता अनुभव सिन्हा याची नवी वेब सीरिज 'IC 814': द कंधार हायजॅक स्टोरी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली आहे. या वेब सीरिजवरुन सोशल मीडियावर वाद सुरू आहे. डिसेंबर 1999 मध्ये इंडियन एयरलाइन्सचं विमान 814 याचं दहशतवाद्यांकडून अपहरण करण्यात आलं होतं. त्यावर  आधारित या सीरिजवर सोशल मीडियावरील एका गटाकडून टीका केली जात आहे. यात कथितपणे अपहरणकर्त्यांची नावं बदलून हिंदू ठेवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. (Web Series 'IC 814': The Kandahar Hijack Story)

नेटफ्लिक्सवर 'IC 814': द कंधार हायजॅक स्टोरी या वेब सीरिजमध्ये इंडियन एयरलाइन्सचं विमान IC 814 च्या अपहरणाची कहाणी दाखवण्यात आली आहे. 24 डिसेंबर 1999 रोजी विमानाचं अपहरण करण्यात आलं होतं. नेपाळच्या काठमांडूच्या त्रिभूवन आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी उड्डाण घेणाऱ्या इंडियन एअरलाइन्सच्या विमानाला पाच दहशतवाद्यांनी हायजॅक केलं होतं. 

अपहरणकर्त्यांचे कोडनेम...
विमानाचं अपहरण करून ते अनेक ठिकाणी उतरविण्यासाठी जबरदस्ती करण्यात आली. शेवटी अफगणिस्तानातील कंधारमध्ये जाऊन विमान थांबवलं. हे विमानतळ तालिबानांच्या नियंत्रणात होतं. या वेब सीरिजमध्ये अपहरणकर्त्यांना चीफ, डॉक्टर, बर्गर, भोला आणि शंकर अशी नावं देण्यात आली आहेत. सोशल मीडियावर अनेकांनी भोला आणि शंकर या नावावर आक्षेप नोंदवला आहे. चित्रपट निर्मात्यांनी जाणूनबुजून अपहरणकर्ते मुस्लीम असताना हिंदू नावं ठेवली, असा आरोप केला जात आहे.  

नक्की वाचा - 'जग तुझ्यावर थुंकेल', कपिल देवबद्दल काय म्हणाले युवराजचे वडील?

काय आहे सत्य?
6 जानेवारी, 2000 रोजी केंद्रीय गृहमंत्रालयाने जारी केलेल्या वक्तव्यानुसार, अपहरणकर्त्यांची खरी नावं काय होती?

- इब्राहिन अतहर, बहावलपूर

- शाहिद अख्तर सईद, गुलशन इकबाल, कराची

- सनी अहमद काजी, डिफेंस एरिया, कराची

- मिस्त्री जहूर इब्राहिम, अख्तर कॉलोनी, कराची

- शाकिर, सुक्कुर सिटी 

परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, प्रत्यक्षात ही घटना घडली तेव्हा अपहरणकर्त्यांनी आपली ओळख लपवण्यासाठी स्वत:ची कोडनावं ठेवली होती. ज्यात चीफ, डॉक्टर, बर्गर, भोला आणि शंकर अशी नावं होती. अपहरणादरम्यान एकमेकांचा बोलवण्यासाठी ते या नावाचा वापर करीत होते. 

Previous Article
बाईईईईई.....प्रेयसी असतानाही निक्कीशी गुलुगुलु, रितेश देशमुख Bigg Boss स्पर्धकावर वैतागला
Kandahar Hijack आधारित वेब सीरिज 'IC 814'मध्ये दहशतवाद्यांना हिंदू नावं का दिली?
who is imanvi prabhas new leading lady in upcoming fauji movie
Next Article
नशीब असावं तर असं! इन्स्टा रीलमुळे 'ती'ला थेट प्रभासच्या मोठ्या सिनेमात मिळाला लीड रोल