Kantara Tiger : कल्पकतेला सलाम! कचऱ्यापासून बनवलाय कांतारामधला खुँखार वाघ, 2 कोटी लोकांनी पाहिला 'हा' VIDEO

Kantara tiger made from waste material: कांतारामध्ये महत्त्वाच्या दृश्यात झळकलेला हा वाघ कोणत्याही महागड्या वस्तूंपासून नव्हेतर कचऱ्यात टाकलेल्या वस्तूंपासून बनवला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Kantara Chapter 1 Tiger Making Viral Video: दाक्षिणात्य अभिनेता आणि दिग्दर्शक  ऋषभ शेट्टीचा कांतारा चॅप्टर 1 चित्रपट प्रचंड प्रचंड गाजला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत कमाईचे अनेक रेकॉर्ड्स मोडित काढले. दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर २ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने जगभरात 847 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. चित्रपटाच्या कथेसोबतच थरारक दृश्यांनी प्रेक्षकांना थक्क केले. आता चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर जवळपास एक महिन्याने एक अत्यंत महत्त्वाची आणि अचंबित करणारी माहिती समोर आली आहे.

कांतारा चित्रपटाची कथा, प्रभावी अभिनय, लोककथांवरील  आधारित कथानक आणि अप्रतिम व्हिएफएक्स (VFX) यामुळे जगभरातील प्रेक्षकांनी त्याचे कौतुक केले. या चित्रपटात दिसलेला खुंखार वाघ पाहून अनेकांची बोबडी वळली. आता याच वाघाबाबत एक इंटरेस्टिंग माहिती मिळाली आहे. कांतारामध्ये महत्त्वाच्या दृश्यात झळकलेला हा वाघ कोणत्याही महागड्या वस्तूंपासून नव्हेतर कचऱ्यात टाकलेल्या वस्तूंपासून बनवला आहे.

VIDEO: रितेश देशमुखच्या आईसाहेबांची कमाल कल्पना! ड्रॅगन फ्रुटच्या शेतात रावबली 'ही' नवी संकल्पना

सोशल मीडियावर कांताराच्या टीममधील काही सदस्यांनी याचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.  इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये कलाकारांची टीम हा भव्य वाघ कसा बनवत आहे, हे दाखवण्यात आले आहे. त्यांनी लाकडी सांगाड्याने  सुरुवात केली आणि नंतर त्यावर सुकलेली केळीची पाने, तण आणि कागदी लगद्याचे वापर करत हा वाघ बनवला आहे.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, वाघाच्या फरसाठी त्यांनी नारळाच्या शेंड्यांचा  वापर केला. कलाकारांनी वाघाच्या चेहऱ्याचे अत्यंत बारकाईने कोरीव काम केले आणि संपूर्ण शरीरावर स्प्रे-पेंटिंग  केले. वाघाच्या शरीरावरील काळ्या पट्ट्याही  अतिशय काळजीपूर्वक रंगवल्या गेल्या. टाकाऊ पदार्थांपासून  बनवलेला कांतारा चित्रपटातील वाघ आता केरळमध्ये आहे, असा कॅप्शन या व्हिडिओला दिला आहे. 

Advertisement

Katrina Kaif: 'त्या' प्रसिद्ध मंदिरात दर्शन अन् कतरिनाला पुत्रप्राप्ती.. कुठे आहे नवसाला पावणारे देवस्थान?

दरम्यान, कांतारा टीममधील सदस्यांच्या भन्नाट आयडियाचे आणि कल्पकतेचे नेटकऱ्यांनी तोंडभरुन कौतुक केले आहे. तुमच्या याच मेहनतीचा परिणाम आणि भव्यता पडद्यावर पाहायला मिळाली अशा प्रतिक्रिया देत नेटकऱ्यांनी त्यांच्या कलेला दाद दिली आहे. या व्हिडिओला आतापर्यंत २.३ कोटींहून अधिक व्ह्यूज आणि १० लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.