Vaishali Deshmukh dragon fruit Farm Viral Video: महाराष्ट्राच्या राजकारणातील सुसंस्कृत, वजनदार राजकीय घराणे म्हणून दिवंगत नेते विलासराव देशमुख यांचे कुटुंबीय ओळखले जाते. अभिनेता रितेश देशमुख, जेनेलिया देशमुख यांचा सोशल मीडियावर प्रचंड मोठा चाहतावर्ग आहे. रितेश- जेनेलिया प्रमाणेच संपूर्ण देशमुख कुटुंब सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असते. देशमुख फॅमिलीचे बाभुळगावमधील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या रितेश देशमुख यांच्या मातोश्री वैशाली देशमुख यांचा एक अनोखा व्हिडिओ माध्यमांमध्ये चर्चेत आला आहे.
कृत्रिम प्रकाशात ड्रॅगन फ्रुटचे उत्पादन| Light-bulb Innovation at her Dragon fruit farm
रितेश देशमुख यांच्या मातोश्री वैशाली देशमुख या बाभुळगावमध्ये शेती करतात. शेतीमध्ये नवनवे प्रयोग, संकल्पना त्या राबवत असतात. सध्या त्यांनी बाभुळगावमधील शेतात ड्रॅगन फ्रुटची शेती केली आहे. या ड्रॅगन फ्रुटच्या शेतीमध्ये त्यांनी एक अनोखा प्रयोग केला आहे, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वैशाली देशमुख यांनी बल्बच्या कृत्रिम प्रकाशात ड्रॅगन फ्रुटचे उत्पादन घेतले आहे.
विलासराव देशमुख यांचे चिरंजीव धीरज देशमुख यांच्या पत्नी दिपशिखा देशमुख यांनी याबाबतचा व्हिडिओ आपल्या इंन्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे. ड्रॅगन फ्रुट हे जितके जास्त प्रकाश संश्लेषण होईल तितके जास्त लवकर तयार होते. यासाठीच वैशाली देशमुख यांनी १८ वॉल्टचे बल्ब प्रत्येक झाडावर लावले आहेत. हे बल्ब झालांना उर्जाही देतात आणि सूर्यकिरणाएवढी उष्णताही तयार करतात, ज्याचा फायदा उत्पादन घेण्यासाठी होतो.
"शेती करत असताना त्यात सातत्याने नवनवीन प्रयोग करण्याचा प्रयत्न आदरणीय आई नेहमी करत असतात याचा आम्हाला खुप अभिमान वाटतो. बाभळगाव येथील शेतीमध्ये आईंनी कृत्रिम प्रकाशाच्या माध्यमातून ड्रॅगन फ्रूट उत्पादनाची नवी संकल्पना राबवली आहे. वंश व दिवीयाना यांना याविषयी माहिती मिळावी यासाठी आम्ही प्रत्यक्षात तिथे भेट दिली. वंश व दिवीयाना यांना आजीमां व धिरज यांनी सविस्तरपणे माहीती दिली, असं दिपशिखा देशमुख यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. त्यांच्या या व्हिडिओवर बॉलिवूड अभिनेते, अभिनेत्रींसह अनेक शेतकऱ्यांनीही कमेंट्स केल्या आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world