स्वातंत्र्यपूर्व काळापासून बॉलिवूडमध्ये कपूर कुटुंबाचा दबदबा आहे. पृथ्वीराज कपूर यांनी 1931 साली बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. आता त्यांची चौथी पिढी हिंदी चित्रपटसृष्टी गाजवतीय.
कपूर घराण्यात एकेकाळी मुलींना चित्रपटात येण्याची परवानगी नव्हती. पृथ्वीराज कपूर, राज कपूर यांच्या काळातील ही परंपरा मोडणारी ही अभिनेत्री म्हणजे करिश्मा कपूर.
16 व्या वर्षी पदार्पण
रणधीर कपूर आणि बबिता यांची मोठी मुलगी असलेल्या करिश्मानं वयाच्या 16 व्या वर्षी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. प्रेम कैदी हा तिचा पहिला चित्रपट 1991 साली प्रदर्शित झाला.
अगदी कमी वयात घराण्याची परंपरा मोडत अभिनेत्री बनलेली करिश्मा ही फक्त पाचवी पास आहे.
गोविंदासोबत गाजली जोडी
1990 च्या दशकात गोविंदासोबत करिश्मा कपूरची जोडी चांगलीच गाजली. या जोडीनं राजाबाबू, दुलारा, खुद्दार, कुली नंबर 1, हिरो नंबर 1, साजन चले ससुराल हे हिट चित्रपट दिले.
6 वर्षांमध्ये 4 वेळा फिल्म फेअर
1990 च्या दशकातील उत्तरार्धात करिश्मा टॉपवर होती. तिने राजा हिंदुस्थानी (1996) आणि फिजा (2000) या चित्रपटासाठी सर्वोत्तम अभिनेत्रीचा पुरस्कार मिळवला. तर दिल तो पागल है (1997), झुबेदा (2001) या चित्रपटासाठी सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्रीचा फिल्मेअर पुरस्कार मिळवला होता. त्यामुळे 6 वर्षांमध्ये 4 वेळी फिल्म फेअर पुरस्कार पटकवण्याचा रेकॉर्ड करिश्माच्या नावावर आहे.
करिश्मानं 2003 साली संजय कपूर या उद्योजकासोबत लग्न केलं. त्यांना समायरा आणि कियान ही दोन मुलं आहेत. 11 वर्षांच्या संसारानंतर 2014 साली या जोडीनं घटस्फोट घेतला.