Kaun Banega Crorepati 17: या प्रश्नामुळे सोडावे लागले 50 लाखांवर पाणी, तुम्ही देऊ शकला असता झटकन उत्तर

Kaun Banega Crorepati 17:या सीझनमधील पहिले स्पर्धक मानवप्रीत सिंग यांनी आपल्या ज्ञानाच्या जोरावर 25 लाख रुपयांपर्यंत मजल मारली होती.

जाहिरात
Read Time: 3 mins
Kaun Banega Crorepati 17: अमिताभ बच्चन हे 17 व्या सीझनमध्येही या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहेत.
मुंबई:

'कौन बनेगा करोडपती'च्या 17व्या (Kaun Banega Crorepati Season 17) सीझनचा शानदार शुभारंभ झाला असून, पहिलाच एपिसोड प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा ठरला. या सीझनमधील पहिले स्पर्धक मानवप्रीत सिंग यांनी आपल्या ज्ञानाच्या जोरावर 25 लाख रुपयांपर्यंत मजल मारली. मात्र, 50 लाख रुपयांसाठी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर न आल्याने त्यांनी शोमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.

( नक्की वाचा: अमिताभ बच्चन यांनी सोडला होता देश , 2 वर्ष घालवली होती एकांतात )

विश्वनाथ कार्तिकेयने कोणता विक्रम केला?

'कौन बनेगा करोडपती 17' च्या पहिल्या एपिसोडमध्ये हॉट सीटवर बसलेल्या मानवप्रीत सिंग यांनी उत्कृष्ट खेळ दाखवला. त्यांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांची अचूक उत्तरे दिली. 25 लाख रुपयांसाठी त्यांना विचारण्यात आलेला प्रश्न होता - '2025 मध्ये, विश्वनाथ कार्तिकेय हा कोणता विक्रम करणारा सर्वात तरुण भारतीय ठरला?' या प्रश्नासाठी त्यांना खालील पर्याय (Options) देण्यात आले होते.

A) इंग्लिश चॅनल पार करणे

B) जगाला प्रदक्षिणा घालणे

C) सेव्हन समिट्सवर चढाई करणे

D) उत्तर ध्रुवावर पोहोचणे

( नक्की वाचा: अमिताभ बच्चन यांच्यासोबत एक संध्याकाळ घालवण्यासाठी रेखा यांनी सोडला होता चित्रपट )

मानवप्रीतने या प्रश्नाचे उत्तर 'C) सेव्हन समिट्सवर चढाई करणे' हे दिले आणि 25 लाख रुपये जिंकले. मात्र त्यानंतर त्याला 50 लाख रुपयांसाठी त्याला प्रश्न विचारण्यात आला होता, ज्याचे उत्तर त्याला देता न आल्याने त्याने खेळ सोडण्याचा निर्णय घेतला.  

कोणत्या प्रश्नावर मानवप्रीत अडखळला ?

25 लाख रुपये जिंकल्यानंतर मानवप्रीतसमोर 50 लाख रुपयांसाठीचा प्रश्न आला. हा प्रश्न साहित्यविषयक होता. त्यांना विचारण्यात आले होते की, 'रवींद्रनाथ टागोर यांनी त्यांच्या 'पुरबी' (Purabi) हा कविता संग्रह कोणत्या दक्षिण अमेरिकन लेखिकेला समर्पित केला होता?  या प्रश्नासाठी त्यांना चार पर्याय देण्यात आले होते:

A) गॅब्रिएला मिस्ट्रल (Gabriela Mistral)

B) व्हिक्टोरिया ओकॅम्पो (Victoria Ocampo)

C) मारिया लुइसा बॉम्बाल (Maria Luisa Bombal)

D) तेरेसा दे ला पार्रा (Teresa de la Parra)

या प्रश्नाचे उत्तर मानवप्रीतला माहित नव्हते आणि त्यांच्याकडे कोणतीही लाईफलाईन (Lifeline) शिल्लक नव्हती. त्यामुळे कोणताही धोका न पत्करता त्यांनी 25 लाख रुपये घेऊन खेळातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अमिताभ बच्चन यांनी या प्रश्नाचे योग्य उत्तर 'B) व्हिक्टोरिया ओकॅम्पो' हे असल्याचे सांगितले.

( नक्की वाचा: शोलेचे 5 भन्नाट किस्से! चित्रपटाच्या शूटिंगला अडीच वर्षे का लागली, तुम्हाला माहित आहे का? )

अमिताभ बच्चन यांनी मानले प्रेक्षकांचे आभार

या शोच्या सुरुवातीला अमिताभ बच्चन यांनी प्रेक्षकांचे आभार मानले. 'कौन बनेगा करोडपती हा केवळ एक गेम शो नसून, लाखो लोकांच्या आशा-आकांक्षांचा एक एकत्रितरित्या होत असलेला प्रवास आहे. माझ्यासाठी केबीसीचे सूत्रसंचालन करणे म्हणजे माझ्या विस्तारत जाणाऱ्या संपूर्ण कुटुंबासोबत बसण्यासारखे आहे', असे ते म्हणाले. या पर्वासाठी आपण दुप्पट मेहनत घेऊ असेही त्यांनी सांगितले. 

Advertisement