Bollywood Superstars Fees For Wedding Guest : भारतात लग्नसोहळे अधिक भव्य करण्यासाठी बॉलिवूडपासून हॉलीवूडपर्यंत अनेक मोठ्या सेलिब्रिटींना डान्स आणि सिंगिंग परफॉर्मन्ससाठी बोलावले जाते. त्यानंतर त्या लग्नांची चर्चा सर्वत्र होते. मात्र, या मोठ्या सेलिब्रिटींना आपल्या लग्नात परफॉर्म करण्यासाठी बोलावणे प्रत्येकासाठी शक्य नसते, कारण यासाठी प्रचंड फी द्यावी लागते. शाहरुख खान, रणवीर सिंह, अक्षय कुमार आणि सलमान खान लग्न किंवा मोठ्या इव्हेंटमध्ये सहभागी होण्यासाठी किती फी घेतात? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. पण या स्टार अभिनेत्यांची फी ऐकून तुम्ही नक्कीच थक्क व्हाल. जाणून घ्या याबाबत सविस्तर माहिती.
शाहरुख खानची फी किती आहे?
बॉलिवूडचा ‘किंग ऑफ रोमान्स' शाहरुख खान ज्या लग्नसोहळ्यात किंवा इव्हेंटमध्ये परफॉर्म करतो, त्याची चर्चा अनेक महिन्यांपर्यंत सुरू राहते. अशातच हॉलीवूड रिपोर्टर इंडियाने खुलासा केला आहे की, जर तुम्हाला शाहरुख खानला आपल्या लग्नात परफॉर्म करण्यासाठी बोलवायचे असेल, तर तुम्हाला 5 ते 6 कोटी रुपये फी द्यावी लागेल.
सलमान खान किती मानधन घेतो?
बॉलिवूडचा भाईजान सलमान खान लग्नसोहळ्यांमध्ये डान्स परफॉर्मन्स करत नाही. पण या सोहळ्यांमध्ये सलमान खानची चीफ गेस्ट म्हणून बोलवायचं असेल, तर 3 ते 4 कोटी रुपये खर्च करावे लागतील. ही फी फक्त काही तासांच्या परफॉर्मन्ससाठीच असते.
नक्की वाचा >> Viral Video : पेट्रोल पंपावर तुमचीही फसवणूक होतेय? काय आहे '0' नंबर मीटर स्कॅम? ग्राहकाने केला पर्दाफाश
रणवीर सिंग आणि अक्षय कुमारची फी सुद्धा कोटीच्या घरात
रणवीर सिंग आणि अक्षय कुमार, ज्यांना प्रत्येक चित्रपटासाठी कोटी रुपयांचं मानधन दिलं जातं. लग्नसोहळा किंवा मोठ्या इव्हेंटमध्ये सहभागी होण्यासाठीही त्यांची फी कोटी रुपयांच्या घरात असते. हॉलीवूड रिपोर्टर इंडियाच्या माहितीनुसार, रणवीर सिंगची फी जवळपास 2 कोटी रुपये आहे, तर अक्षय कुमारची फी 1.25 ते 1.5 कोटी रुपये आहे.
या अभिनेत्री घेतात लाखो, कोटींचं मानधन
जिथे बॉलिवूडच्या पुरुष अभिनेत्यांची फी कोटींमध्ये असते, तिथे बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रीही लाखों-कोटीं रुपये फी घेतात. जर तुम्हाला तुमच्या लग्नात तमन्ना भाटिया आणि नोरा फतेही सारख्या अभिनेत्रीला बोलवायचे असेल, तर तुम्हाला 1.25 ते 1.5 कोटी रुपये खर्च करावे लागतील. तर सारा अली खान, दिशा पाटनी आणि जान्हवी कपूर यांची फी 60-70 लाख रुपयांपर्यंत जाते.
नक्की वाचा >> लेक रात्री 2 वाजता ढसाढसा रडत होती, बापाने केलं असं काही..व्हिडीओ पाहून सर्वच आई-वडिलांचे डोळे पाणावतील!
सेलिब्रिटीसोबत येते संपूर्ण टीम
हॉलीवूड रिपोर्टर इंडियाच्या अहवालानुसार, जेव्हा तुम्ही एखाद्या मोठ्या सेलिब्रिटीला लग्न किंवा इव्हेंटमध्ये बोलावता, तेव्हा त्यांच्या सोबत त्यांची संपूर्ण टीम येते, ज्यात हेअर स्टायलिस्ट, मेकअप आर्टिस्ट, कॉस्ट्युम स्टायलिस्ट, सेक्युरिटी आणि स्पॉट बॉय यांचा समावेश असतो. तसेच हेही लक्षात घ्या की जर सेलिब्रिटी प्रायव्हेट प्लेनने इव्हेंटच्या ठिकाणी पोहोचत असतील, तर त्याचा खर्च ते वेगळा आकारतात आणि हॉटेलचा खर्च फीमध्ये समाविष्ट नसतो.