Kunickaa Sadanand On Sanjay Dutt : 'बिग बॉस 19'मध्ये स्पर्धकांमध्ये कोणत्या ना कोणत्या गोष्टींवरून वादविवाद होत असल्याचं आपण नेहमीच पाहतो. बिग बॉसच्या घरात अशा काही गोष्टी घडतात, ज्याचे व्हिडीओ व्हायरल झाल्यावर अनेकांना धक्का बसतो.पण "बिग बॉस 19' मधून नुकतीच बाहेर पडलेली अभिनेत्री कुनिका सदानंद तिच्या मुलाखतीमुळे खूप चर्चेत आली आहे. तिने सुपरस्टार संजय दत्तसोबत काम करण्याचा अनुभव शेअर केला आहे. त्या काळात ती सुद्धा संजय दत्तची मोठी चाहती होती, असं तिने म्हटलं आहे. पण याचसोबत कुनिकाने संजय दत्तच्या काही गुपित गोष्टीही उघड केल्या आहेत.
कुनिका सदानंद संजय दत्तबाबत नेमकं काय म्हणाली?
कुनिकाने 'बिग बॉस 19'मधून बाहेर पडल्यावर एका मुलाखतीत संजय संजय दत्तसोबत सेटवर काम करण्याचा अनुभव कसा होता, याचा पाढाच वाचला आहे. कुनिकाने म्हटलंय की,तिने संजय दत्तसोबत ‘गुमराह',‘थानेदार'सारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.त्या काळात मुली संजयला पाहण्यासाठी आणि त्याला स्पर्श करण्यासाठी वेड्या व्हायच्या." यावेळी कुनिका हसत म्हणाली,‘मीसुद्धा त्यापैकीच एक होते.जेव्हा संजय सेटवर माझा हात धरायचा किंवा मला मिठी मारायचा,त्या क्षणी मी आनंदाने भारावून जायचे.त्यावेळी सेल्फीचा जमाना नव्हता,नाहीतर माझ्याकडे त्याच्या शेकडो फोटोंचा संग्रह असता.
नक्की वाचा >> Gauri Garje News: डॉ. गौरी गर्जे आत्महत्या की खून? पती अनंत, दीर, नणंदेविरोधात तक्रार, 'तो' पुरावा आला समोर
"संजय दत्त खरा जेंटलमन आणि चार्मिंग व्यक्ती"
संजय दत्तचं कौतुक करताना कुनिका म्हणाली,‘त्या काळात संजू खूपच हँडसम होता आणि आजही आहे.लोक त्याच्या बॉडी काउंटबद्दल बोलतात,पण कुणी त्याच्या आयुष्यातील संघर्षाकडे पाहत नाही.तो खरा जेंटलमन आणि चार्मिंग व्यक्ती आहे.'बिग बॉस हाऊसमध्ये फॅमिली वीकदरम्यान कुनिका बाहेर पडली तेव्हा सगळेच आश्चर्यचकित झाले होते.शोमधून बाहेर आल्यानंतर ती सतत तिच्या जुन्या आठवणींना उजाळा देत आहे आणि फॅन्सना तिच्या आणि संजय दत्तच्या त्या सुवर्णकाळाची झलक दाखवत आहे.