जाहिरात

Gauri Garje News: डॉ. गौरी गर्जे आत्महत्या की खून? पती अनंत, दीर, नणंदेविरोधात तक्रार, 'तो' पुरावा आला समोर

भाजपच्या नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉ. गौरी पालवे-गर्जेनं आत्महत्या केलीय. वाचा या घटनेची इनसाईड स्टोरी.

Gauri Garje News: डॉ. गौरी गर्जे आत्महत्या की खून? पती अनंत, दीर, नणंदेविरोधात तक्रार, 'तो' पुरावा आला समोर
Gauri Garje Latest News
मुंबई:

राहुल कुलकर्णी, प्रतिनिधी

Gauri Garje Death Inside Story : भाजपच्या नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉ. गौरी पालवे-गर्जेनं आत्महत्या केलीय. या धक्कादायक घटनेमुळं एकच खळबळ उडाली आहे. गौरीनं वरळीत राहत्या घरी गळफास घेऊन स्वत:ला संपवलं. याप्रकरणी मृत गौरीचे वडील अशोक मारूती पावले यांनी अनंत भगवान गर्जे, नणंद शितल गर्जे आणि भाऊ अजय गर्जेविरोधात तक्रार दाखल केलीय. गौरीने आत्महत्या केली नसून तिचा खून झाला असावा, असा संशय गौरीच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. या घटनेबाबाबतची इसाईड स्टोरी जाणून घ्या सविस्तरपणे.

गौरी आणि आणि तिचा पती अनंत गर्जे यांच्यात नेमकं काय घडलं होतं?

एनडीटीव्ही मराठीचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांनी दिलेली माहिती अशी की, "ज्यावेळी हे लग्न झालं, तेव्हा नव्या घरात जात असताना अनंत गर्जे यांनी वरळी येथे जेव्हा नवीन घर शिफ्ट केलं, तेव्हा गौरीच्या हातात अत्यंत महत्त्वाची कागदपत्रे लागली. त्याची कॉपी एनडीटीव्ही मराठीला मिळाली आहे.लातूर येथील ममता रुग्णालयात एका महिलेच्या डिलिव्हरी संदर्भातील ती कागदपत्रे आहेत.

त्या महिलेचे पती म्हणून अनंत गर्जेचं नाव होतं. एफआयआरच्या माहितीनुसार, त्यानंतर त्यांच्यात वादाला सुरुवात झाली.तेव्हा तिने प्रश्न विचारला की, ही महिला कोण? तिच्या प्रेग्नन्सीशी तुमचा काय संबंध आहे? त्यानंतर अनंतने असं म्हटलंय की, जर तू हे प्रकरण इतर कोणाला सांगितलं,तर मी तुझं नाव लिहून आत्महत्या करेल.विवाहबाह्य संबंधं आहे की लग्नाआधीचं अफेअर आहे, हे कुटुंबापासून लपवून ठेवलं गेलं होतं."

नक्की वाचा >> रविवारी सुट्टीच्या दिवशी पुण्यात मोठी कारवाई! नेत्यांच्या नातेवाईकांचे रिसॅार्ट जमीनदोस्त, 300 बांधकामे पाडणार

गौरीच्या हाती लागली खळबळजनक कागदपत्रे

"एफआरमध्ये लिहिलंय की, कुटुंबातील प्रत्येक सदस्याला अनंत गर्जेचे या महिलेसोबत असलेले संबंध माहित होते.त्याच्या भावाने गौरीला याची कल्पना दिली होती. परंतु, तिने फार गांभीर्याने ते घेतलं नाही.वरळीच्या ठिकाणी जेव्हा त्यांचं नवीन घर शिफ्ट झालं,तेव्हा ती कागदपत्रे सापडल्यानंतर याचं गांभीर्य गौरीच्या लक्षात आलं.तिथून पती-पत्नीचे खटके उडायला सुरुवात झाली.एफआयआरनुसार, त्यांच्या कुटुंबीयांचं असं मत आहे की, ही आत्महत्या नसून त्यांना खुनाची शंका येत आहे.त्यांनी एफआयआरमध्ये तीन लोकांची नावं लिहिली आहेत. 1. अनंत भगवान गर्जे (पती/जावई).2. शितल भगवान गर्जे-आंधळे (अनंतची बहीण/नणंद) 3.अजय भगवान गर्जे (अनंतचा भाऊ/दीर)". 

नक्की वाचा >>Big News : स्मृती मंधानाच्या लग्नात विघ्न! वडिलांना लग्नाच्या ठिकाणीच आला हृदयविकाराचा झटका

"या तिघांची चौकशी करावी, ही आत्महत्या आहे की खून आहे? अशा चौकशीची मागणी गौरीच्या वडिलांनी केली आहे. त्यातला एक महत्त्वाचा पुरावा असा आहे, जेव्हा गौरीला लग्नानंतर काही काळानंतर भेटले तेव्हा गौरीच्या मानेवर आणि शरीराच्या इतर काही भागात त्यांना जखमा आढळून आल्या. मारल्याचे व्रण होते.तेव्हापासून गौरीला मारहाण होत होती. अनंतचे इतर स्त्री सोबत असलेले संबंध ते कारण आहेत, असा आरोप आहे".

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com