जाहिरात

Pune News:पुण्यात सर्वात मोठी कारवाई! नेत्यांच्या नातेवाईकांच्या रिसॉर्टवर बुलडोझर, शहराजवळील 300 बांधकामेही..

पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे.राजकीय नेत्यांचे आणि त्यांच्या नातेवाईकांचे रिसॉर्ट,फार्महाऊस आणि अन्य अनधिकृत बांधकामे पाडण्यात आली आहेत.

Pune News:पुण्यात सर्वात मोठी कारवाई! नेत्यांच्या नातेवाईकांच्या रिसॉर्टवर बुलडोझर, शहराजवळील 300 बांधकामेही..
Pune Latest News
मुंबई:

राहुल कुलकर्णी, प्रतिनिधी 

Pune Breaking News : पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पुणे शहराजवळच खडकवासला,पानशेत,वरसगाव आणि पवना धरण पाणलोट क्षेत्रात अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर राजकीय नेत्यांचे आणि त्यांच्या नातेवाईकांचे रिसॉर्ट,फार्महाऊस आणि अन्य अनधिकृत बांधकामे सुरु होती. प्रशासन आणि जलसंपदा विभागाने मोठ्या मोहिमेंतर्गत काल शनिवारी 22 नोव्हेंबरपासून थेट कारवाईला सुरुवात केलीय.

प्रशासनाने प्रमुख नेत्यांच्या नातेवाईकांनी उभारलेल्या रिसॉर्टवर थेट कारवाई करत ही बांधकामे पूर्णपणे जमीनदोस्त केले आहेत. या रिसॉर्टच्या मालकाकडे फक्त 12 गुंठे जमीन असतानाही त्याने 32 गुंठ्यांवर बांधकाम केले होते. त्यामुळे 20 गुंठे अतिक्रमण हटवण्यात आलं आहे. कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता ही कारवाई करण्यात आली आहे. एकूण 300 बांधकाम तोडण्याची मोहिम सुरु करण्यात आली आहे.

नक्की वाचा >> Big News : स्मृती मंधानाच्या लग्नात विघ्न! वडिलांना लग्नाच्या ठिकाणीच आला हृदयविकाराचा झटका

Latest and Breaking News on NDTV

अनेक जुने फार्महाऊस,रिसॉर्ट आणि दारू भट्ट्याही हटवण्यात आल्या

मिळालेल्या माहितीनुसार, ही कारवाई फक्त एका ठिकाणीच नव्हे तर खडकवासला परिसरात जवळपास 100,पानशेतमध्ये 30,पवना 12 आणि वरसगाव 5 अशा एकूण 300 अतिक्रमणांवर करण्यात आली आहे.या प्रक्रियेमुळे अनेक जुने फार्महाऊस,रिसॉर्ट आणि दारू भट्ट्याही हटवण्यात आल्या. कारवाईची प्रकिया सध्या सुरु असून पुढील काही दिवस ती सुरु राहणार असल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी एनडीटीव्ही मराठीशी बोलताना म्हटलं आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com