Lapandav New Serial: स्टार प्रवाहवरील खलनायिका आणि आवडत्या नायकाचे कमबॅक, ही नवी मालिका येतेय भेटीला

Lapandav New Marathi Serial: स्टार प्रवाह चॅनेलवर नवी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेद्वारे तुमची आवडती खलनायिका आणि नायक कमबॅक करत आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins
'Lapandav New Marathi Serial: लोकप्रिय खलनायिका आणि नायकाचं कमबॅक'

Lapandav New Marathi Serial: स्टार प्रवाह चॅनेलवर लवकरच 'लपंडाव' (Lapandav New Marathi Serial) ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेतून अभिनेता चेतन वडनेरे (Chetan Vadnere) आणि अभिनेत्री रुपाली भोसले (Rupali Bhosle) दमदार कमबॅक करत आहेत. स्टार प्रवाहवर नवनव्या मालिकांचा प्रवाह अखंड सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच भेटीला आलेली 'हळद रुसली कुंकू हसलं' मालिकेने प्रेक्षकांचे मन जिंकलं आहे. आता 'लपंडाव' (Lapandav New Marathi Serial) ही नवीकोरी मालिका स्टार प्रवाह चॅनेलवर लवकरच सुरू होणार आहे.

रुपाली भोसलेचे कमबॅक

'आई कुठे काय करते' मालिकेतील संजना म्हणजेच लोकप्रिय अभिनेत्री रुपाली भोसले छोट्या विश्रांतीनंतर मालिका विश्वामध्ये दमदार पुनरागमन करणार आहे. यावेळी संजना नाही तर सरकार बनून ती पुन्हा एकदा आपल्या अभिनयाची छाप पाडायला सज्ज झाली आहे. 

(नक्की वाचा: Bin Lagnachi Gosht: प्रिया बापट- उमेश कामत 12 वर्षांनी मोठ्या पडद्यावर एकत्र)

लपंडाव मालिकेतील भूमिकेतील आव्हानात्मक : रुपाली भोसले

या मालिकेतल्या भूमिकेविषयी रुपाली भोसलेने सांगितले की, 'लपंडाव मालिकेमध्ये तेजस्विनी कामत हे पात्र मी साकारत आहे. जिला सर्व आदराने सरकार असं म्हणतात. प्रेम आणि नात्यांपेक्षा तिच्या लेखी पैशांना जास्त महत्त्व आहे. घरात आणि ऑफिसमध्येही तेजस्विनीचच राज्य आहे. आतापर्यंत साकारलेल्या भूमिकांपेक्षा ही भूमिका नक्कीच वेगळी आणि आव्हानात्मक आहे. आई कुठे काय करते मालिकेतील मी साकारलेल्या संजना या पात्राला आणि तिच्या लुकला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिले. तेजस्विनी कामतचाही ग्लॅलमरस अंदाज पाहायला मिळेल. माझ्या लुकवर संपूर्ण टीमने बरीच मेहनत घेतली आहे. मी हे नवं पात्र साकारण्यासाठी प्रचंड उत्सुक आहे'. 

Advertisement

Advertisement

(नक्की वाचा: Vin Doghantali Hi Tutena Serial: तेजश्री प्रधान-सुबोध भावेची नवी मालिका आणि गायिका श्रेया घोषालचे आहे हे खास कनेक्शन)

चेतन वडनेरे आणि कृतिका देवची नवी जोडी

लपंडाव मालिकेमध्ये चेतन वडनेरे आणि कृतिका देव ही नवी जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. चेतनने यापूर्वी 'ठिपक्यांची रांगोळी' या मालिकेद्वारे प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. चेतनला पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

Advertisement