जाहिरात

Tejashri Pradhan Subodh Bhave Serial: तेजश्री प्रधान-सुबोध भावेची नवी मालिका आणि गायिका श्रेया घोषालचे आहे हे खास कनेक्शन

Tejashri Pradhan And Subodh Bhave New Serial: तेजश्री प्रधान आणि सुबोध भावे यांच्या नवीन मालिकेशी प्रसिद्ध गायिका श्रेया घोषालसोबत खास कनेक्शन आहे, हे तुम्हाला माहितीये का?

Tejashri Pradhan Subodh Bhave Serial: तेजश्री प्रधान-सुबोध भावेची नवी मालिका आणि गायिका श्रेया घोषालचे आहे हे खास कनेक्शन
Tejashri Pradhan And Subodh Bhave New Serial: वीण दोघांतली ही तुटेना मालिकेशी श्रेया घोषालचे खास कनेक्शन

Tejashri Pradhan And Subodh Bhave New Serial: अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि अभिनेता सुबोध भावे यांच्या नव्याकोऱ्या मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. सुबोध भावे आणि तेजश्री प्रधान यांच्या मालिकेचे नाव काय असणार? मालिकेतील दोघांचा लुक कसा असणार आहे? दोघांच्या पात्राचे नाव काय असेल। अशा असंख्य प्रश्नांची उत्तरं चाहत्यांना जाणून घ्यायची होती. अखेर प्रेक्षकांची प्रतीक्षा आज (24 जून) संपलीय आणि 1.35 मिनिटांचा प्रोमो रिलीज करण्यात आला. ‘वीण दोघांतली ही तुटेना' (Vin Doghantali Hi Tutena Promo) असे तेजश्री आणि सुबोध यांच्या नव्या मालिकेचे नाव आहे. 

प्रोमोमध्ये (Vin Doghantali Hi Tutena Promo) सुबोध भावे (Subodh Bhave) श्रीमंत घरातील व्यक्ती दिसतोय तर तेजश्री प्रधान (Tejashri Pradhan And Subodh Bhave New Serial) मध्यमवर्गीय तरुणीच्या भूमिकेत असल्याचे दिसतंय. दोघंही त्यांच्या ठरलेल्या लग्नाबाबत चर्चा करण्यासाठी भेटलेले असतात. दोन भिन्न स्वभावाच्या व्यक्तींच्या लग्नाची अनोखी गोष्ट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. समर आणि स्वानंदीची कहाणी कशी असणार हे पाहण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत.

(नक्की वाचा: तेजश्रीने 'जान्हवी'चे मंगळसूत्र अजूनही सांभाळून ठेवलंय, कारण…)

Vin Doghantali Hi Tutena Serial Promo Video 

सर, ऑर्डर प्लीज

समर : चिकन सिझलर, चिकन घी रोस्ट, चिकन प्लॅटर अँड ब्लॅक स्पार्कलिंग वॉटर 

स्वानंदी : एक एक मिनिट, मी नॉनव्हेज खात नाही आणि माझी ऑर्डर मी देऊ शकते…

समर : तुम्हाला कोणी सांगितलं की तुम्ही नॉनव्हेज खा… ही मी माझी ऑर्डर दिली… तुम्हाला काय हवंय ते तुम्ही सांगा

स्वानंदी : एक… दादा एक दाल खिचडी

मिस्टर समर…  आपण लग्न साध्या पद्धतीने करूया… डेस्टिनेशन वेडिंग नको…

समर : नाही, डेस्टिनेशनच असेल फक्त फॉरेनला नसेल... इथे भारतात

स्वानंदी : पण मग मानपान तरी आपण आपापले करूयात

समर :  ते सगळं ठरवलंय मी

स्वानंदी : सगळंच ठरवलंय तुम्ही 

समर : हमम

स्वानंदी : मग आपण का भेटलोय?

समर :  नाही म्हणजे मी काय ठरवलंय ते तुम्हाला कळलं पाहिजे ना

स्वानंदी : चला, म्हणजे माझ्या बोलण्याला काही अर्थ नाहीये

समर : मिस स्वानंदी, आपल्या लग्नाबद्दल काहीच बोललो नाही आपण

स्वानंदी : त्याबद्दल काय बोलायचंय? ते तर ठरलेलंच आहे

स्वानंदी : मी माझ्या भावाच्या सुखासाठी हे लग्न करतेय 

समर : आणि मी माझ्या बहिणीच्या…

प्रसिद्ध गायिका श्रेया घोषालचा मालिकेशी खास कनेक्शन 

'वीण दोघांतली ही तुटेना' (Vin Doghantali Hi Tutena Promo) मालिकेशी प्रसिद्ध गायिका श्रेया घोषालचे खास कनेक्शन आहे. नेमके काय आहे कनेक्शन जाणून घेऊया… समर (Subodh Bhave) आणि स्वानंदी (Tejashri Pradhan) यांच्यातील संभाषणानंतर ‘वीण दोघांतली ही तुटेना' असे गाण्याचे बोल ऐकू येतात. हा आवाज लोकप्रिय गायिका श्रेया घोषालचा आहे. झी मराठी वाहिनीवर वर्ष 2016मध्ये झळकलेल्या ‘खुलता कळी खुलेना' मालिकाचे टायटल ट्रॅक श्रेया घोषालने गायले होते आणि हे गाणं देखील प्रचंड गाजले होते. आजही हे गाणे तितकेचे लोकप्रिय आहे. याच गाण्यातील ‘वीण दोघांतली ही तुटेना' ही ओळ तेजश्री प्रधान आणि सुबोध भावेच्या नव्या मालिकेच्या (Tejashri Pradhan And Subodh Bhave New Serial) प्रोमोमध्ये ऐकायला मिळालीय.

सस्पेन्स संपला! तेजश्री प्रधान- सुबोध भावे झळकणार 'या' नव्या कोऱ्या मालिकेत

(नक्की वाचा: सस्पेन्स संपला! तेजश्री प्रधान- सुबोध भावे झळकणार 'या' नव्याकोऱ्या मालिकेत)

‘खुलता कळी खुलेना' मालिकेचे टायटल ट्रॅक (Khulta Kali Khulena Title Track)

मी पाहावे तू दिसावे

पारणे या मनाचे फिटेना 

अंतरीची अंतरे ही 

का तरीही सारी मिटेना..

हीच प्रीती, हीच भीती 

वीण दोघांतली ही तुटेना

हेच कोड रोज थोडे

सोडवावे तरीही सुटेना

आस मुकल्या जीवनाची

आज खुलता कळी ही खुलेना 

वाट चुकल्या या मनाची

आज खुलता कळी ही खुलेना

(नक्की वाचा: Tejashri Pradhan: ये नशा ये खुशी, अब न कम हों कभी... तेजश्री प्रधान नव्या रुपात येतेय प्रेक्षकांच्या भेटीला)

वीण दोघांतली ही तुटेना मालिका कधीपासून होणार सुरू?

दरम्यान तेजश्री आणि सुबोध भावे यांची नवीकोरी मालिका प्रेक्षकांना कधी पाहायला मिळणार, याबाबतची माहिती गुलदस्त्यात ठेवलीय.  सुबोध भावे आणि तेजश्री प्रधानला छोट्या पडद्यावर एकत्र पाहण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com