Gautami Patil: प्राजक्ताच्या मदतीला गौतमी पाटील धावली! सुरेश धस यांच्या वक्तव्यावर थेट बोलली; ट्रोलर्सना फटकारले

बीडमधील गुन्हेगारीबाबत बोलताना धस यांनी मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीचे नाव घेत टीका केली होती. ्यावरुन राजकारण रंगत असतानाच आता लावणी कलाकार गौतमी पाटीलनेही यावर प्रतिक्रिया दिली आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

निनाद करमारकर:  बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांचे हत्याकांड प्रकरण सध्या राज्यभर गाजत आहे. विरोधकांसह भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस यांनीही या प्रकरणावरुन धनंजय मुंडेंना टार्गेट केलं आहे. बीडमधील गुन्हेगारीबाबत बोलताना धस यांनी मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीचे नाव घेत टीका केली होती. ्यावरुन राजकारण रंगत असतानाच आता लावणी कलाकार गौतमी पाटीलनेही यावर प्रतिक्रिया दिली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

काय म्हणाली गौतमी पाटील?

 'कलाकार हा कलाकार असतो. त्याचं नाव कुणासोबत जोडून त्याची बदनामी करणं चुकीचं आहे. अभिनेत्री प्राजक्ता माळीने घेतलेली भूमिका योग्य असून आपण तिच्या भूमिकेचं समर्थन करतो, असं म्हणत नृत्यांगणा गौतमी पाटीलने प्राजक्ता माळीची पाठराखण केली आहे. तसेच तिने ट्रोलर्सनांही खडेबोल सुनावले आहेत.

तसेच मलाही याआधी अशाच प्रकारे ट्रोल केले गेले होते मात्र मी खचून गेली नाही. त्यामुळे प्राजक्ता ताईनेही खंबीरपणे उभं राहून आपली कला सादर करत राहावी, आणि हसत राहावं, असंही गौतमी पाटील यावेळी म्हणाली. शनिवारी ती बदलापूरच्या आगरी महोत्सवात परफॉर्मन्ससाठी आली होती. यानंतर माध्यमांशी बोलताना तिने या वादावर आपले मत मांडले. 

ट्रेंडिंग बातमी - Suresh Dhas: 'प्राजक्ता माळींची पत्रकार परिषद म्हणजे...' सुरेश धस यांनी पुन्हा डिवचलं

काय म्हणाले होते सुरेश धस?

'कोणाला जर इव्हेंट मॅनेजमेंट करायचं असेल तर त्यांनी बीडला यावे. इकडे  सपना चौधरी रश्मिका मंदाना येते, प्राजक्ताताईही येतात असं म्हणत त्यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळीवर निशाणा साधला होता. यावरच प्राजक्ता माळीने आक्षेप घेत आक्रमक भूमिका घेतली. तसेच काल तिने पत्रकार परिषद घेत सुरेश धस यांना खडेबोल सुनावले. 

'ते इव्हेंट मॅनेजमेंटबाबत सांगत होते. पण, यामध्ये महिला कलाकारांचीच नावं का येतात? परळीला कधीच कुणी पुरुष कलाकार कार्यक्रमाला गेला नाही का? त्यांची नावं का येत नाहीत? इव्हेंट मॅनेजमेंटचं तुम्हाला उदाहरण द्यायचं असेल तर पुरुष कलाकारांची नावं घ्या ना, असे म्हणत  कुठल्याही पुरुषाच्या किंवा राजकारण्यांच्या कुबड्यांशिवाय एखादी महिला स्वकर्तुत्वावर यशस्वी होऊ शकत नाही का?' असा सवाल तिने उपस्थित केला होता.