आमदार सुरेश धस यांनी केलेल्या वक्तव्याची त्यांनी माफी मागावी अशी मागणी अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी केली आहे. त्यांची ही मागणी धुडकावून लावत आपण जे बोललो त्यावर ठाम आहोत. आपण काही चुकीचं बोललो नाही. त्यामुळे माफी मागण्याची गरज नाही. उलट संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरुन लक्ष विचलीत व्हावं यासाठी केलेली ही पत्रकार परिषद होती असा आरोपच सुरेश धस यांनी केला आहे. त्यामुळे हे प्रकरण आणखी तापण्याची दाट शक्यता आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्यावर टीका करताना प्राजक्ता माळी यांचेही नाव घेतले होते. प्राजक्ता ताईसुद्धा आमच्या इथं येतात. तर याच्यासाठी अतिशय जवळचा पत्ता जर तुम्हाला सापडायचा असेल तर तो आमच्या परळी पॅटर्नता आहे. असं वक्तव्य केलं होतं. त्यावर प्राजक्ता माळी यांनी पत्रकार परिषद घेत सुरेश धस यांच्या या वक्तव्याचा निषेध केला होता. शिवाय धस यांनी माफी मागावी अशी मागणी केली होती. त्यांची ही मागणी धस यांनी धुडकावून लागली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात कोणाची तरी कोंडी झालेली आहे. ती फोडण्यासाठी काही क्लुप्त्या केल्या जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून ही पत्रकार परिषद घेतली गेली असा आरोप धस यांनी केला आहे.
प्राजक्ता माळी यांनी मी जे वक्तव्य केलं ते त्यांनी पुन्हा एकदा पहावं असं ते म्हणाले. त्यांचा गैरसमज त्यांनी दूर करून घ्यावा. त्यांना राजकारणात खेचण्याचा काही एक संबंध नाही. त्या काय माझ्या दुष्मन नाहीत. शिवाय त्यांची आणि माझी ओळखही नाही. मी त्यांना केवळ महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रम पाहत असतो असं धस म्हणाले. त्यांनी माझा आता निषेध केला आहे. तर मी पण त्यांचा निषेध म्हणून महाराष्ट्राची हास्य जत्रा बघायचं बंद करतो असं धस यांनी जाहीर केलं.
आपण कोणत्याही स्थितीत माफी मागणार नाही. संतोष देशमुख प्रकरणावरून लक्ष विचलीत करण्याचा हा डाव असल्याचं ही ते म्हणाले. शिवाय त्यांचे संबंध हा शब्द वापरला असेल तर तो परत घेतो असं ही ते म्हणाले. पुढे बोलताना प्राजक्ता ताई तुम्हाला हात जोडून विनंती तुम्ही आता स्टेटमेंट थांबवा. माझ्या मतावर आजही मी ठाम आहे. त्यांनी माझा निषेध केला तर मुंबईत जाऊन त्यांना मी भेटणार आहे असंही ते म्हणाले. त्यांना कोणीतरी प्रेस घ्यायला लावली आहे की काय हा खरा प्रश्न आहे असंही त्यांनी सांगितले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world