महान तबला वादक झाकीर हुसैन यांची प्रकृती गंभीर, अमेरिकेच्या रुग्णालयात ICU मध्ये केलं दाखल

महान तबला वादक झाकीर हुसैन यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे.

जाहिरात
Read Time: 1 min
मुंबई:

महान तबला वादक झाकीर हुसैन यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्कोमधील एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, झाकीर हुसैन हृदयासंबंधित आजाराचा सामना करीत आहेत. सध्या त्यांची प्रकृती जास्तच खालावल्याची माहिती आहे. 

नक्की वाचा - Sunil Pal : बनावट कार्यक्रम, खंडणी आणि... कॉमेडियन सुनील पालनं सांगितली अपहरणाची संपूर्ण स्टोरी

झाकीर हुसैन हृदयसंबंधित आजाराशी सामना करीत असल्याने त्यांच्यावर अमेरिकेत उपचार सुरू आहे. गेल्या काही वर्षांपासून त्यांना हृदयासंबंधित आजाराशी झुंज देत आहेत. तब्बल दोन वर्षांपूर्वी हृदयातील  ब्लॉकेजमुळे त्यांना स्टेंट लावण्यात आला होता. त्यानंतर आज त्यांची तब्येत जास्त खालावल्याची माहिती समोर येताच चाहत्यांना धक्काच बसला.