Bollywood News : आपल्या भारदस्त आवाजाने बॉलिवूडमधील एका अभिनेत्याने सिनेरसिकांच्या हृदयामध्ये स्वतःचे पक्के स्थान निर्माण केले. विशिष्ट शैलीतील आवाजामुळेच या अभिनेत्याच्या वाट्याला अनेकदा खलनायकाचीच भूमिका आल्याचे पाहायला मिळाले. अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी खलनायकाची भूमिका अतिशय उत्तमरित्या निभावली. मोठ्या पडद्यावर कधी त्यांनी हिरो-हिरोईनच्या प्रेमाचे शत्रू म्हणून भूमिका साकारली तर कधी कटकारस्थान रचून एखाद्या कुटुंबाचे सुख हिरावून घेतले. पण खऱ्या आयुष्यामध्ये ही व्यक्ती सिनेमातील पात्रांच्या तुलनेत पूर्णपणे वेगळीच होती. ना कोणत्या वाईट गोष्टीचे व्यसन, ना एखाद्या व्यक्तीबाबत त्यांच्या मनामध्ये वाईट विचार होते.
हे वर्णन त्याच खलनायकाचे आहे, जे प्रत्यक्षामध्ये त्यांच्या सुंदर व्यक्तिमत्त्वासाठी बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध आहेत. यामुळेच त्यांची प्रेमकहाणी देखील अतिशय निराळी आणि मनोरंजक होती. हो तुम्ही अगदी बरोबर ओळखले! आपण अमरीश पुरी यांच्याबाबत बोलतच आहोत. ज्यांना संपूर्ण सिनेसृष्टीसह सिनेरसिक देखील कधीही विसरू शकणार नाहीत.
अमरीश पुरी यांची अनोखी लव्ह स्टोरी
सिनेसृष्टीमध्ये पदार्पण करण्यापूर्वी अमरीश पुरी एक विमा कंपनीमध्ये क्लर्क म्हणून कार्यरत होते. येथेच त्यांची उर्मिला दिवेकर यांच्याशी पहिल्यांदा भेट झाली. पहिल्या भेटीतच अमरीश पुरी उर्मिला दिवेकर यांच्या प्रेमात पडले. उर्मिला यांचा साधेपणा त्यांना खूप भावला. ओळख वाढल्यानंतर दोघांच्या भेटीगाठीही वाढल्या आणि उर्मिला दिवेकर यांनाही अमरीश पुरी आवडू लागले.
कुटुंबीयांचा लग्नाला होता विरोध
यानंतर दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण हे स्वप्न सत्यात उतरवणे इतके सोपे नव्हते. कारण त्या काळामध्ये प्रेमविवाह फारच क्वचित होत असत. याव्यतिरिक्त दोघांच्याही कुटुंबीयांची पार्श्वभूमी वेगवेगळ्या राज्यांतील होती. त्यामुळे सुरुवातीस दोघांच्या कुटुंबीयांकडून नकारच होता. कुटुंबीयांचा विरोध असला तरीही हे दोघंही लग्न करण्याचा निर्णयावर ठाम होते. अखेर यांच्या प्रेमासमोर कुटुंबीयांना माघार घेतली व अमरीश पुरी-उर्मिला दिवेकर लग्नबंधनामध्ये अडकले.
खलनायकाची ही भूमिका आजही सिनेरसिकांच्या आहे लक्षात
अमरीश पुरी यांनी मोठ्या पडद्यावर अनेक व्यक्तिरेखा उत्तमरित्या साकारल्या आहेत. मग ही भूमिका एखाद्या खलनायकाची असो किंवा हळव्या-कणखर स्वभावाच्या वडिलांची. अमरीश पुरी यांच्या प्रत्येक भूमिकेस सिनेरसिकांना भरभरून प्रतिसाद दिला. पण मिस्टर इंडिया सिनेमातील त्यांनी साकारलेले खलनायक मोगॅम्बोचे पात्र व ‘मोगेम्बो खुश हुआ' हा डायलॉग आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे.
आणखी वाचा
पापा की परी! खलनायक रणजीतच्या लेकीचा ग्लॅमरस लुक, तुम्ही पाहिले का हे PHOTOS?
एक दोन नव्हे तर मिथून चक्रवर्तीच्या 29 सिनेमे टॉकीजमध्ये झळकण्यापूर्वीच झाले आऊट!
Video : तुम्ही ज्यांच्यावर प्रेम करता... ऐश्वर्याच्या नात्याबाबत काय म्हणाला होता सलमान?