Madhugandha Kulkarni | Paresh Mokashi: परेश मोकाशी आणि मधुगंधा कुलकर्णी हे मराठी सिनेसृष्टीतील आदर्श जोडपे म्हणून प्रसिद्ध आहे. प्रत्येकाला हेवा वाटावा, असे या दोघांमधील नाते अप्रतिम आहे. पण आता या पॉवरफुल जोडप्यामध्ये भलतंच कॉम्पिटिशन सुरू आहे. दोघांपैकी जास्त कुरुप कोण? असा प्रश्न या जोडप्याला पडलाय. मधुगंधा कुलकर्णीने सोशल मीडियावर शेअर केलेला व्हिडीओ देखील व्हायरल होतोय.
मधुगंधा कुलकर्णीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये मधुगंधा आणि परेश दोघंही शीर्षासन करताना दिसत आहेत. या व्हिडीओच्या माध्यमातून मधुगंधाने दोघांमधील संवाद देखील चाहत्यांसोबत शेअर केलाय. नेमके काय आहे प्रकरण? जाणून घेऊया...
मधुगंधा कुलकर्णी आणि परेश मोकाशीचा शीर्षासन करतानाचा व्हिडीओ| Madhugandha Kulkarni|Paresh Mokashi |Sirsasana| Headstand Pose
शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये मधुगंधा म्हणतेय की, "कौतुकाने मी परेशला अॅनिव्हर्सरीचा व्हिडीओ दाखवला. तो व्हिडीओ पाहून परेश मला म्हणाला बापरे मधुगंधा मी किती कुरुप दिसतो. तू कसं काय लग्न केलंस माझ्याशी? त्याच्यावर मी त्याला म्हटलं की, परेश मलाही बरेचदा असंच वाटतं, मी किती कुरुप दिसते तू कसं काय लग्न केलं माझ्याशी?. मग आम्ही दोघं एकमेकांच्या चेहऱ्याकडे सून्न होऊन बघत होतो. थोड्या वेळाने मलाच राहवेना. मी परेशला म्हटलं पण तरी तुला काय वाटतं, आपल्या दोघांमध्ये जास्त कुरुप कोण आहे? बायको म्हणून मला असं उत्तर अपेक्षित होतं की, नाही नाही मधुगंधा त्यातल्या त्यात तू बरी दिसतेस. पण परेश माझ्या चेहऱ्याकडे निरखून पाहत राहिला आणि थोड्या वेळाने म्हणाला आपल्या दोघांमध्ये जास्त कुरुप कोण? असे काही फार कॉम्पिटिशन नाहीय. दोघंही सारखेच कुरुप आहोत. या प्रश्नाने मला खरंतर राग येणे अपेक्षित होतं, पण मला आलं हसू आणि मी अगदी कन्फ्युजज्ड आहे की मी रडू की हसू?"
चाहत्यांना त्यांचा हा व्हिडीओ खूप आवडतोय. चाहत्यांकडून पोस्टवर शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे.
(नक्की वाचा : Dashavatar Movie: दशावतार सिनेमाच्या निमित्ताने 3 दिग्गज पहिल्यांदाच एकत्र, रंगपूजा भैरवी गाणं रिलीज VIDEO)
मधुगंधा कुलकर्णी आणि परेश मोकाशी यांच्या लग्नाला 14 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने मधुगंधाने ही खास पोस्ट शेअर केलीय.
मधुगंधा आणि परेश मोकाशी या जोडीने 'हरिश्चंद्राची फॅक्टरी', 'एलिझाबेथ एकादशी', 'वाळवी', 'मुक्कामपोस्ट बोंबिलवाडी', 'नाच गं घुमा', 'चि आणि चि.सौ.का.' यासारख्या दमदार सिनेमांची निर्मिती केलीय. मराठी सिनेसृष्टीतील ही जोडी सर्वात लोकप्रिय आहे. दिग्दर्शनाव्यतिरिक्त नाटक, सिनेमा, मालिकांमध्येही मधुगंधाने काम केलंय.
(नक्की वाचा : Deepika Padukone: दीपिका पादुकोणने लेकीचा बर्थडे खास पद्धतीने केला साजरा, Dua's Birthday Photo)
परेश मोकाशीच्या वाढदिवसानिमित्त मधुगंधाची खास पोस्ट
मधुगंधा कुलकर्णीने परेश मोकाशीच्या वाढदिवसानिमित्तही खास पोस्ट शेअर केली होती. पोस्टमध्ये तिने लिहिलं होतं की, "खोटा वाटावा इतका चांगला माणूस. सरस्वतीदेवीचा वरदहस्त घेवूनच आज जगात अवतीर्ण झालेला हा मनुष्य , साधा, सरळ , मितभाषी , कुणाची निंदा, नाही कुणा वर टीका नाही , आपलं वाचन, लेखन , महाभारताचा अभ्यास यात रमणारा, कुणाच्या अध्यात नाही मध्यात नाही...आपल्या विश्वात मश्गूल, अबोलपणामुळे शिष्ट वाटणारा. व्यवहारापासून दूर राहणारा! जगात रमणारा तरीही गारगोटीसारखा कोरडा असणारा, संतत्व अंगी बाळगून असला तरी जमिनीशी सदैव जोडलेला. प्रतिभावंत आणि अभ्यासू असा माझा मित्र, गुरू, सहलेखक , दिग्दर्शक नवरा...परेश जन्म दिवसाच्या लाख लाख शुभेच्छा . खूप खूप प्रेम ❤️❤️❤️❤️❤️"