जाहिरात

Dashavatar Movie: दशावतार सिनेमाच्या निमित्ताने 3 दिग्गज पहिल्यांदाच एकत्र, रंगपूजा भैरवी गाणं रिलीज VIDEO

Dashavatar Movie News: दशावतार सिनेमातील महत्त्वपूर्ण गाणे प्रेक्षकांच्या भेटीला

Dashavatar Movie: दशावतार सिनेमाच्या निमित्ताने 3 दिग्गज पहिल्यांदाच एकत्र, रंगपूजा भैरवी गाणं रिलीज VIDEO
Dashavatar Movie News: रंगपूजा भैरवी गाणे रीलिज

Dashavatar Movie: मराठी सिनेसृष्टीतील सर्वाधिक चर्चेत असलेला 'दशावतार' या बहुप्रतीक्षित सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशातील अनमोल ठेवा असलेला दशावतार ही परंपरा मोठ्या पडद्यावर मांडली जाणार आहे. या सिनेमातील हृदयस्पर्शी 'रंगपूजा' ही भैरवी नुकतीच रसिकांच्या भेटीस आली आहे.

गुरु ठाकूर, अजय गोगावले आणि ए. व्ही. प्रफुल्लचंद्र हे भन्नाट त्रिकूट एकत्र ! 

या गाण्यामध्ये एका निस्सीम कलावंताची कलेवरील नितांत श्रद्धा, भक्ती आणि समर्पणाची भावना मांडली गेलीय. हे गीत म्हणजे कलावंताच्या रंगभूमीवरील कलाप्रवासाला भावपूर्ण अभिवादन आहे. विशेष म्हणजे गीतकार गुरू ठाकूर, गायक अजय गोगावले आणि संगीतकार ए. व्ही. प्रफुल्लचंद्र हे  त्रिकुट प्रथमच या गाण्यात एकत्र आलंय. या गाण्याद्वारे या चित्रपटाचे, नायक बाबुली मेस्त्रीच्या आयुष्याचे मर्म मांडले गेलंय. गुरु ठाकूर यांची अर्थपूर्ण शब्दरचना, त्याला अजय गोगावले यांचे आर्त स्वर यामुळे गाण्याला अनोखा आयाम मिळाला आहे. तर ए. व्ही. प्रफुल्लचंद्र यांच्या सुमधुर सुरावटींनी गाण्यात खास रंगत आणली आहे. 

दशावतारातील भैरवीचे महत्त्व 

गायक अजय गोगावले म्हणाले, "दशावतार नाटकांमध्ये जितके नांदीला महत्त्व आहे तितकेच 'रंगपूजा' या भैरवीलाही आहे! भैरवी झाल्याशिवाय नाटकातील कुठलाही कलावंत आपल्या चेहऱ्यावरील रंग उतरवत नाही. म्हणूनच "दशावतार" चित्रपटातील ही 'रंगपूजा' ही भैरवीसुद्धा तितकीच महत्त्वपूर्ण आहे. गुरु ठाकूरच्या लेखणीतून उतरलेली ही भैरवी प्रत्येक कलाकाराचं मर्म आहे. ही भैरवी मलाही खूप रीलेट करुन गेली. गुरु ठाकूरचे शब्द नेहमीच भावोत्कटता आणतात. ए. व्ही. प्रफुल्लचंद्रने त्याला संगीताचं उत्तम कोंदण केलंय. त्यामुळे ती गाताना वेगळं समाधान मला मिळालं. या भैरवी मुळे मी सुद्धा या चित्रपटाचा भाग होऊ शकलो, याचा मला खरोखर आनंद आहे."

Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: Dashavatar Movie

(नक्की वाचा: Dasavatar: मराठी चित्रपटसृष्टीत भव्यतेचं नवं पर्व घेऊन येणाऱ्या ‘दशावतार' चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर)

'दशावतार'मुळे इच्छा पूर्ण झाली: ए. व्ही. प्रफुल्लचंद्र

संगीतकार ए. व्ही. प्रफुल्लचंद्र म्हणाले, "अजय गोगावले यांच्यासोबत काम करायची माझी खूप आंतरिक इच्छा होती आणि ‘दशावतार'मुळे ती पूर्ण झाली. हा माझ्या संगीतप्रवासातील सर्वात आनंदाचा क्षण आहे."

गीतकार गुरु ठाकूर म्हणाले, "कलावंताच्या आयुष्यावरचा हा सिनेमा आहे. कुठलीही कलाकृती तुम्ही करता, असं म्हणण्यापेक्षा, त्यासाठी तुमची निवड होणे, हे तुमच्या भाग्योदयात लिहिलेलं असतं, असं मी मानतो. या चित्रपटाचे संवाद, गाणी दिग्दर्शक सुबोध खानोलकरने माझ्याकडून लिहून घेतली आणि एकेक योग जुळत गेले. गीतकाराने फक्त शब्द लिहिणे पुरेसे नसते, तर ते शब्द आणि त्यातील भावना रसिकांपर्यंत पोहोचवणारा आवाज महत्त्वाचा असतो. माझ्या गाण्यांना अजयचा आवाज लाभतो तेव्हा मी आश्वस्त होतो. अजय गोगावलेने आजवर मी लिहिलेली कित्येक गाणी अजरामर केली आहेत. रेकॉर्डिंग स्टुडिओत अजय ही भैरवी गात होता तेव्हा मी आणि सुबोध अक्षरशः हळवे झालो होतो. 

(नक्की वाचा: Marathi Movie : 'हा' चेहरा नेमका कोणाचा? ‘दशावतार' सिनेमाचं पोस्टर रिलीज, गूढ वाढलं)

'दशावतार'चे लेखन, दिग्दर्शन सुबोध खानोलकर यांनी केले आहे. 

'दशावतार'मधील तगडी स्टारकास्ट

दिलीप प्रभावळकर, महेश मांजरेकर, भरत जाधव, सिद्धार्थ मेनन, अभिनय बेर्डे, प्रियदर्शिनी इंदलकर, विजय केंकरे, रवी काळे यांसारखे दिग्गज कलाकार यात भूमिका साकारत आहेत.

'दशावतार' सिनेमा कधी रीलिज होणार?

येत्या 12 सप्टेंबरला ‘दशावतार' जगभर प्रदर्शित होणार आहे. अजय गोगावलेंच्या आवाजातील 'रंगपूजा' ही भैरवी  हा या चित्रपटाचा कळसाध्याय आहे!

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com