Madhuri Dixit: 'ब्लाऊज काढ नाही तर चित्रपट सोड' 90 च्या दशकात माधुरी दीक्षित सोबत काय घडलं होतं?

त्यावर अमिताभ बच्चन यांनी मध्यस्थी केली होती. ते म्हणाले होते की वाद करू नका.

जाहिरात
Read Time: 3 mins
मुंबई:

बॉलिवूडमध्ये माधुरी दीक्षितचं एक वेगळं स्थान आहे. तिने तिच्या अभिनय आणि नृत्याच्या जोरावर 90 च्या दशकात बॉलिवूडवर राज्य केलं. तिची एक वेगळीच क्रेझ होती. तिचा मोठा चाहता वर्ग होता. धकधक गर्ल म्हणून माधुरी दीक्षितची ओळख होती. बॉलिवूडमधील मराठी कलाकाराचा एक दबदबा होता. प्रत्येक दिग्दर्शकाला माधुरी आपल्या चित्रपटात असावी असं वात होतं. ती त्यावेळी प्रसिद्धीच्या शिखरावर होती. त्याच वेळी एका कारणासाठी दिला दिग्दर्शकाने चित्रपटातून काढून टाकण्याची धमकी दिली होती. त्यामागचे कारण ही खतरनाक होते. एक गोष्ट करण्यास माधुरीने थेट नकार दिली होता. त्यामुळे हा वाद निर्माण झाला होता. 

माधुरी दीक्षितला सुरूवातीच्या काळात फारसं यश मिळालं नाही. तिचे एकामागून एक चित्रपट फ्लॉफ होत होते. त्यामुळे आपलं करिअरचं काय होणार याची चिंता माधुरीला त्यावेळी लागली होती. त्यावेळी तिला हवा तसा पाठिंबा कुणाकडूनही मिळाल नाही. अशा वेळी चित्रपट सृष्टी सोडण्याचा विचार ही तिच्या मनात आला होता. तसा निर्णय ही तिने घेतला होता. काही काळ आपण फिल्म इंडस्ट्री पासून दूर राहू असं तिने ठरवलं होतं. पण 1988 नंतर माधुरी दीक्षितचं नशिबच पालटलं. तिला तेजाब चित्रपटात मोहिनीची भूमीका मिळाली आणि ती अजरामर झाली. एका रात्रीत माधुरी दीक्षित स्टार झाली. 

नक्की वाचा - EXCLUSIVE: दाऊदचा भाऊ इकबाल कासकर समुद्रकिनारी जायला का घाबरायचा? प्रदिप शर्मांनी सांगितला भन्नाट किस्सा

त्यानंतर माधुरीने कधी ही मागे वळून पाहिले नाही. एकामागून एक हिट चित्रपटाची छडीच तिने लावली. त्यात अबोध, त्रिदेव, राम लखन, जमाई राजा, साजन, हम आपके है कौन, दिल तो पागल है, देवदास,  या सारख्या दर्जेदार चित्रपटातून आपला अभिनय आणि नृत्याने सर्वांनाच वेडे केले. पण त्याच वेळी माधुरी अशा एका चित्रपटात काम करीत होती, ज्यासाठी तिने आधी होकार दिला होता. पण जेव्हा त्या चित्रपटातील एक सीन करण्याची वेळ आली तेव्हा तिने स्पष्ट  शब्दात नकार दिला होता.

टिनू आनंद यांनी याबाबतचा किस्सा त्यांनी आपल्या मुलाखतीत सांगितला आहे. ते या चित्रपटाचे दिग्दर्शन करत होत. ते म्हणाले की  मी तिला सुरुवातीलाच सांगितं होतं, एका सीनसाठी तुला ब्लाऊज काढावं लागेल. तिनं ब्रा घातलेली असेल आणि त्यावर सीन शूट होणार आहे. तिच्यापासून कोणतीही गोष्ट लपवण्यात आलेली  नव्हती. त्यावेळी कथानकाची तशी गरज होती असं ते म्हणाले. शिवाय  मी तिला असंही सांगितलं होतं की शूटिंगच्या पहिल्याच दिवशी तो सीन शूट करायचा आहे. 

Advertisement

नक्की वाचा - Trending News:'आता नको ना! आमच्यात पहिल्याच रात्री 'हे'नाही करत', नवरी बोलली अन् सकाळी नवरा पाहतो तर...

पण ज्या वेळी हा सीन शूट करण्याची वेळ आली त्यावेळी मात्र तिने तो सीन करण्यास नकार दिला. त्यावेळी आपण तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. तिला विचारलं तू हा सीन का करत नाहीस. त्यावर माधुरी म्हणाली टीनू मला हा सीन करायचा नाही. पण मी तिला म्हणाला होतो की तुला हा सीन करावाच लागेल. नाही तर तू या चित्रपटातून बाहेर पड असं स्पष्ट सांगितलं होतं. त्यावर अमिताभ बच्चन यांनी मध्यस्थी केली होती. ते म्हणाले होते की वाद करू नका. तिला सीन करायचा नसेल तर नका करू. पण मी ठाम होती. मी म्हणालो की तसं तिने आधीच सांगायला हवं होतं असं टीनू आनंद म्हणाले. पुढे त्या सीनसाठी माधुरी तयार झाली. ती सीन सूट झाला. चित्रपट ही तयार झाला. पण तो चित्रपट बॉक्स ऑफीसवर फ्लॉप झाला.