Tamanna Bhatia : तमन्ना भाटियाची ED कडून चौकशी, या घोटाळ्याबाबत अभिनेत्री रडारवर

Mahadev Satta App : दक्षिण भारतीय आणि बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आणि डान्सर तमन्ना भाटियाची (Tamanna Bhatia) ED नं चौकशी केली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Mahadev Satta App प्रकरणात अभिनेत्री तमन्ना भाटियाची चौकशी
मुंबई:

Mahadev Satta App : दक्षिण भारतीय आणि बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आणि डान्सर तमन्ना भाटियाची (Tamanna Bhatia) ED नं चौकशी केली आहे. महादेव सट्टा अ‍ॅप प्रकरणात तमन्नाची गुरुवारी गुवाहाटीमध्ये चौकशी करण्यात आली. या प्रकरणात यापूर्वीही अनेक बॉलिवूड कलाकारांची नावं समोर आली आहेत.

या प्रकरणात सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महादेव बेटिंगच्या सब्सिडरी अ‍ॅप असलेल्या Fair Play App वर आयपीएल  (IPL)  प्रमोट करण्याचा आरोप आहे. Fair Play नं आयपीएल 2023 सामन्यांचं अवैध पद्धतीनं प्रसारण केलं. त्यामुळे Viacom कंपनीचं आर्थिक नुकसान झाले. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी सब्सिडरी अ‍ॅपच्या प्रमोशन प्रकरणात तमन्नाला नोटीस बजावली होती. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

कोणत्या कलाकारांची झाली चौकशी ?

या प्रकरणात ईडीनं सट्टा अ‍ॅपमधील जाहिरातींमध्ये दिसलेले अभिनेता रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूरची चौकशी केली होती. त्याचबरोबर रॅपर बादशाहला देखील चौकशीसाठी बोलवाले होते. ED नं या प्रकरणात अभिनेता संजय दत्तलाही चौकशीसाठी बोलावले होते. पण, त्यानं ED समोर सादर होण्यापूर्वी काही वेळ मागितला होता. या प्रकरणात फिटेनस इन्स्फल्यूंसर साहिल खानला नुकतंच ताब्यात घेण्यात आलं आहे. 

( नक्की वाचा : रवीना टंडनवर झालेला हल्ला होता नियोजनबद्ध कटाचा भाग, अभिनेत्रीनं केला धक्कादायक गौप्यस्फोट )

तमन्नाची चौकशी का?

फेअर प्ले अ‍ॅपच्या वतीनं प्रमोशन करण्यासाठी तमन्नाला कुणी संपर्क केला. तसंच तिला या प्रमोशनसाठी किती पैसे मिळाले याची माहिती घेण्यासाठी तमन्नाला चौकशीसाठी बोलावलं असल्याची माहिती आहे. 
 

Advertisement
Topics mentioned in this article