जाहिरात

6 महिने डेट, 18 व्या वर्षी लग्न! घरच्यांच्या विरोधात जावून मोनालिसासोबत लग्न करणारा मुस्लीम पती कोण?

घरच्यांच्या विरोधाला न जुमानता या दोघांनी केरळ गाठले आणि तेथील 'अरुमानूर श्री नयनार देव' मंदिरात विवाह केला.

6 महिने डेट, 18 व्या वर्षी लग्न! घरच्यांच्या विरोधात जावून मोनालिसासोबत लग्न करणारा मुस्लीम पती कोण?
  • प्रयागराजमध्ये 2025 मध्ये महाकुंभातून प्रसिद्ध झालेली मोनालिसाने अवघ्या अठराव्या वर्षी लग्न केले आहे
  • फरमान खान हा उत्तर प्रदेशातील बागपतचा रहिवासी असून महाराष्ट्र आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अभिनेता आहे
  • दोघांची ओळख फेसबुकवरून झाली असून सहा महिन्यांच्या डेटिंगनंतर मोनालिसाने लग्नासाठी प्रपोज केले होते
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

Mahakumbh Girl: प्रयागराज इथं 2025 साली झालेल्या महाकुंभातून रातोरात प्रसिद्धीच्या झोतात आलेली मोनालिसा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी चर्चेचे कारण तिचे व्यावसायिक यश नसून तिचे वैयक्तिक आयुष्य आहे. अवघ्या 18 व्या वर्षी मोनालिसाने आपला प्रियकर फरमान खान याच्याशी विवाह केला आहे. वेगवेगळ्या धर्माचे असल्याने या विवाहावरून सध्या सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत असून एका मोठ्या वादाला तोंड फुटले आहे. मात्र याची कोणती ही परवा न करता हे दोघे ही लग्न बंधनात अडकले आहेत.  

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील बागपत येथील रहिवासी असलेला फरमान खान हा महाराष्ट्र आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत लहान-मोठ्या भूमिका करणारा अभिनेता आणि मॉडेल आहे. दीड वर्षांपूर्वी फेसबुकच्या माध्यमातून या दोघांची ओळख झाली होती. सुरुवातीला मैत्री आणि नंतर सहा महिन्यांच्या 'डेटिंग'नंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे, मोनालिसानेच फरमानला लग्नासाठी प्रपोज केले होते. त्यानंतर या दोघांनी लग्नाबाबत चर्चा केली. शिवाय धर्म वेगळे असताना ही लग्नाचा महत्वाचा निर्णय घेतला.

नक्की वाचा - Isha Dey Wedding: महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम ईशा डेने केले लग्न, कोण आहे तिचा पती अभिषेक खणकर? वाचा सविस्तर

मोनालिसा मूळची इंदूरची असून तिच्या वडिलांनी या विवाहाला कडाडून विरोध केला होता. त्यांच्या पसंतीच्या मुलाशी लग्न करण्यासाठी तिच्यावर दबावही टाकला जात होता, अशी माहिती समोर आली आहे. मात्र, घरच्यांच्या विरोधाला न जुमानता या दोघांनी केरळ गाठले आणि तेथील 'अरुमानूर श्री नयनार देव' मंदिरात विवाह केला. 'द डायरी ऑफ मणिपूर' या चित्रपटात काम करणाऱ्या मोनालिसाच्या या निर्णयामुळे तिचे चाहते सध्या आश्चर्यचकित झाले आहेत.

नक्की वाचा - Arjun Tendulkar Wedding: ऐश्वर्या-अभिषेकचा समोर आला असा एक Video, चाहते म्हणाले, 'हीच खरी...

या दोघांची प्रेमकहाणी सोशल मीडियावर सुरू झाली. फेसबुकवरून संवाद वाढला आणि मोनालिसा त्याच्या प्रेमात इतकी वेडी झाली की तिनेच लग्नाचा प्रस्ताव ठेवला. धक्कादायक म्हणजे, फरमानने सुरुवातीला तिला नकार दिला होता. पण सहा महिने एकमेकांना डेट केल्यावर फरमानने होकार दिला. आज हे दोघेही पती-पत्नी म्हणून एकत्र राहत आहेत. मोनालिसाने एका मुस्लीम मुलाशी लग्न केल्याने सोशल मीडियावर मोठा गदारोळ माजला आहे. "इतक्या लहान वयात हा निर्णय घ्यायला नको होता," अशा कमेंट्स नेटकरी करत आहेत. मात्र, मोनालिसा आणि फरमानने केरळमधील मंदिरात जाऊन लग्न करत सर्व टीकाकारांना उत्तर दिले आहे. लोकप्रियतेसोबतच आता मोनालिसाच्या आयुष्यात वादाचे वारेही वाहू लागले आहेत.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com