जाहिरात

Monalisa News: फरमानशी लग्न केल्यानंतर मोनालिसाच्या आयुष्यात वादळ, सासरे म्हणाले: घरात पाऊलही ठेवू देणार नाही

Farman Khan Monalisa News: जाफर अली म्हणाले की, "माझ्या धाकट्या मुलाने मला फोन करून सांगितले की फरमानचे लग्न झाले आहे आणि टीव्हीवर बातम्या सुरू आहेत. जेव्हा मी बातमी पाहिली तेव्हा मला रात्रभर झोप आली नाही कारण मला त्याच्या निर्णयामुळे खूप दुःख झाले होते.

Monalisa News: फरमानशी लग्न केल्यानंतर मोनालिसाच्या आयुष्यात वादळ, सासरे म्हणाले: घरात पाऊलही ठेवू देणार नाही
"Farman Khan Monalisa News: लग्नानंतर मोनालिसासमोर नवे संकट"
  • मोनालिसा आणि फरमान यांचा विवाह सोशल मीडियावर चर्चेचा विषय
  • फरमान हा बागपत जिल्ह्यातील पलडी गावचा रहिवासी असून त्याने सिनेमा आणि वेब प्रोजेक्ट्समध्ये काम केलंय
  • फरमानच्या कुटुंबीयांना लग्नाला विरोध
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

- विपिन सोलंकी, प्रतिनिधी

Farman Khan Monalisa News: प्रयागराजमधील कुंभमेळ्यातून चर्चेत आलेली मोनालिसा आणि बागपतचा मुस्लीम तरुण फरमान यांच्या लग्नाची सध्या सोशल मीडियासह परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे. पण फरमानचे कुटुंबीय या लग्नामुळे प्रचंड नाराज असून त्यांनी त्याला घरात प्रवेश देण्यासही नकार दिला आहे.

मोनालिसा आणि फरमानसोबत नेमकं काय घडलं? | Farman Khan Monalisa News

फरमान हा उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यातील पलडी गावचा रहिवासी आहे. त्याने गावातूनच आपले शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. शिक्षणांनंतर तो कामाच्या शोधात दिल्लीला गेला आणि तिथे त्याने सिनेमा तसेच वेब प्रोजेक्ट्समध्ये काम करण्यास सुरुवात केली. दरम्यान केरळमध्ये 'मणिपूर फाइल्स' या सिनेमाचे चित्रीकरण सुरू असताना त्याची भेट मोनालिसाशी झाली. या शूटिंगदरम्यान दोघांमध्ये जवळीक वाढली आणि त्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात होऊन त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

काही दिवसांपूर्वीच दोघांनी लग्न केले, यानंतर हे दोघंही चर्चेत आले आहेत. फरमानच्या निर्णयामुळे त्याचे कुटुंबीय नाराज झाले आहेत. फरमानचे वडील जाफर अली आणि भाऊ समदने मीडियाशी बातचीत करताना म्हटलं की, आम्हाला त्यांच्या लग्नाबाबत माहिती नव्हती आणि आम्ही नाराज आहोत. 

(नक्की वाचा: 6 महिने डेट, 18 व्या वर्षी लग्न! घरच्यांच्या विरोधात जावून मोनालिसासोबत लग्न करणारा मुस्लीम पती कोण?)

Latest and Breaking News on NDTV

वडील जाफर अली काय म्हणाले?

जाफर अली यांनी सांगितले की, "फरमान वर्षातून फक्त एक-दोनदाच घरी येतो. त्याने केलेल्या या लग्नामुळे आम्ही अजिबात खूश नाही. 15 दिवसांपूर्वी फोनवर बोलणे झाले होते, पण त्याने लग्नाबद्दल काहीही सांगितले नव्हते. मला फक्त एवढेच माहित होते की त्याची आणि एका अभिनेत्रीची मैत्री आहे, पण ते लग्न करतील अशी कल्पना नव्हती. मी समाजात सर्व जाती-धर्माच्या लोकांमध्ये बसतो. मी स्वतः जाट मुस्लीम आहे. 

जाफर अली म्हणाले की, "माझ्या धाकट्या मुलाने मला फोन करून सांगितले की फरमानचे लग्न झाले आहे आणि टीव्हीवर बातम्या सुरू आहेत. जेव्हा मी बातमी पाहिली तेव्हा मला रात्रभर झोप आली नाही कारण मला त्याच्या निर्णयामुळे खूप दुःख झाले होते. त्याने माझ्या संमतीशिवाय लग्न केले म्हणून मीही अस्वस्थ झालो होतो. आम्ही फरमानचं लग्न आमच्याच समाजात केले असते. आता हे प्रकरण पिढ्या-न्-पिढ्या चालेल. त्यांना मुले होतील आणि मग ते कोणत्या जातीचे आहेत हा प्रश्न निर्माण होईल. यामुळे भविष्यात मुलांच्या लग्नात अडचणी निर्माण होतील. फरमानला मी घरातही येऊ देणार नाही." 

(नक्की वाचा: Deepika Padukone: दीपिकाचा संयम सुटला! मुंबईच्या सद्यस्थितीवर ट्वीट; BMC ला टॅग करत म्हणाली...)

Latest and Breaking News on NDTV
फरमानचा भाऊ समद का आहे नाराज? 

फरमानचा भाऊ समद याने सांगितले की, "फरमानने हे पाऊल उचलून खूप मोठी चूक केली आहे. फरमानच्या लग्नाच्या बातम्या पाहिल्यानंतर मी लगेच कुटुंबीयांना माहिती दिली. त्यानं लग्नाचा निर्णय घरी कोणालाही सांगितला नव्हता".  

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com