Malaika Arora Father Died: बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराचे वडील अनिल मेहता यांनी राहत्या घरातून उडी मारून स्वतःचे जीवन संपवले आहे. वांद्रे येथील राहत्या घराच्या सहाव्या मजल्यावरून उडी घेऊन त्यांनी आत्महत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार ही घटना सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास घडली.
अनिल मेहता यांनी इतके टोकाचे पाऊल उचलल्याने त्यांचे कुटुंबीय आणि नातेवाईकांना मोठा धक्का बसला आहे. मलायका अरोराच्या घरी मुंबई पोलिसांचे पथक पोहोचले आहे.
Photo Credit: Varinder Chawla
मलायकाचा पहिला पती आणि अभिनेता अरबाज खान देखील तिच्या घरी पोहोचला आहे. अरबाज खान पोलिसांच्या संपर्कात आहे. पोलिसांनी अनिल मेहता यांचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टेमसाठी पाठवला आहे. दरम्यान पोलिसांना घटनास्थळी सुसाइड नोट वगैरे असे काहीही सापडले नाही. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून अनिल मेहता आजारी होते, अशी माहिती समोर येत आहे.
मलायका अरोरा कार्यक्रमानिमित्त पुण्यामध्ये दाखल झाली होती. वडिलांच्या आत्महत्येबाबत माहिती मिळताच ती मुंबईच्या दिशेने रवाना झाली आहे.
Photo Credit: Varinder Chawla