Prithvik Pratap Video Viral : महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेता पृथ्वीक प्रताप सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून पृथ्वीक खासगी तसेच कामाशी संबंधित माहिती तो चाहत्यांसोबत शेअर करत असतो. याशिवाय कॉमेडी व्हिडीओ देखील शेअर करत असतो. असाच एक व्हिडीओ त्याने ब्रेकअप या विषयावर शेअर केला आहे. इन्फ्लुएन्सर मैत्रिणीमुळे त्याचं कसं ब्रेकअप झालं? असा गंमतीशीर हा व्हिडीओ आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
"याला girlfriend माफ करेल का??" या कॅप्शनसह moody_marathi_mulgi या अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आहे. हा व्हिडीओ ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या नव्या सीझनच्या प्रमोशनचा भाग आहे.
(नक्की वाचा- Rinku Rajguru: रिंकू होणार कोल्हापूची सून? भाजपच्या बड्या नेत्याच्या मुलासोबतच्या Photo ने चर्चा)
व्हिडीओमध्ये पृथ्वीक त्याच्या गर्लफ्रेंडच्या स्वभावाविषयीची माहिती मैत्रिणीला सांगताना दिसत आहे. मी भांडलो की सॉरी मीच म्हणतो आणि ती भांडली तरी सॉरी मीच बोलायचं. सॉरी मीच म्हणतो काय करू? अशी तक्रार तो मैत्रिणीकडे करत असतो.
पाहा व्हिडीओ
यावर मैत्रीण त्याला आता फोन कर आणि गर्लफ्रेंडशी ब्रेकअप कर असा सल्ला देते. जरा स्वत:कडे बघ, तुझ्या मागे 56 मुली आहेत. त्यानंतर पृथ्वीकही उत्साहाच्या भरात गर्लफ्रेंडला फोन करतो आणि ब्रेकअप करतो. मात्र त्यानंतर त्याची जी फजित होते, ती पाहून तुम्ही पोट धरून हसाल.
(नक्की वाचा - Krishnraj Mahadik : रिंकू राजगुरूशी लग्नाची चर्चा सुरू असलेले कृष्णराज महाडिक कोण आहे?)
कधीपासूनच सुरु होणार महाराष्ट्राची हास्यजत्रा?
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमाचा नवीन सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कॉमेडीची हॅट्रिक ही नव्या सीझनची टॅगलाइन असणार आहे. सोमवार ते बुधवार रात्री 9.30 वाजता सोनी टीव्ही मराठी वाहिनीवर हा कार्यक्रम प्रेक्षकांना पाहता येणार आहे.