Mahavatar Narsimha Movie: 'महावतार नरसिम्हा'तील नरसिंहाचा आवाज कोणाचा आहे माहिती आहे का ?

Mahavatar Narsimha All Voice Artist List: या चित्रपटात पौराणिक भूमिकांना दिलेला भारदस्त आवाज प्रेक्षकांचे मन जिंकत आहे. चित्रपटातील सर्व वॉईस कलाकारांचे प्रचंड कौतुक होत आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Mahavatar Narsimha Movie Voice Artist: 'महावतार नरसिम्हा' हा  चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. अश्विन कुमार दिग्दर्शित हा चित्रपट दररोज कमाईचे नवनवे रेकॉर्ड करत आहे. रिलीजच्या १० व्या दिवशी,या चित्रपटाने आतापर्यंतची सर्वाधिक कमाई केली आहेच, परंतु 'सन ऑफ सरदार २', 'धडक २' आणि 'सैयारा' या चित्रपटांनाही मागे टाकले आहे.चित्रपटाची पटकथा जयपुरन दास यांनी लिहिली आहे. तर संवाद लिहिण्याची जबाबदारी रुद्र प्रताप घोष यांच्यावर होती. या चित्रपटात पौराणिक भूमिकांना दिलेला भारदस्त आवाज प्रेक्षकांचे मन जिंकत आहे. चित्रपटातील सर्व वॉईस कलाकारांचे प्रचंड कौतुक होत आहे. पण कोणत्या भूमिकेला कोणी आवाज दिला? हे माहिती आहे का? नसेल तर जाणून घ्या...

फाडून टाकले! सन ऑफ सरदार-2 आणि धडक-2 नरसिंहापुढे हरले

कोणत्या भूमिकेला कोणी आवाज दिला?

संकेत जयस्वाल- नॅरेटर
भक्तप्रल्हाद: हरिप्रिया मट्टा 
नरसिम्हाः हरजित वालिया
माता लक्ष्मी- वसुंधरा बोस
हिरणकश्यप-, आदित्यराज शर्मा
 नारद मुनी -हरीश मोली
गुरु शुक्राचार्य- दिनेश वर्मा 
 कयादू- प्रियंका भंडारी
 होलिका- जब्बार शेरणी
दिती- वसुंधरा बोस
बकसिया- आकाश जोशी
होलिका- सावंरी याग्निक
कश्यप मुनी- दिनेश वर्मा
गरुड- अजय सिंघ
अखंडा- संकल्प जयस्वाल
इंद्रदेव- डिक्सोन शाह
वरुणदेव- शाहिद जफर
 सूर्यदेव- अंशुल शर्मा
ब्रम्हदेव: अभिषेक शर्मा
बकसिया- आकाश जोशी

नरसिंहाची बॉक्स ऑफिसवर डरकाळी! 'सैय्यारा'चा पालापाचोळा उडवत कमावला 250% नफा

'महावतार नरसिन्हा'ची कथा हिरण्यकश्यप नावाच्या राक्षसाने केलेल्या अत्याचारांभोवती फिरते. जो स्वतःला देव मानून लोकांना त्रास देत असे. एकीकडे त्याची दहशत दिसत होती, तर दुसरीकडे त्याचा मुलगा - प्रल्हाद होता. जो भगवान विष्णूचा एक  भक्त आहे. हा चित्रपट भगवान विष्णूच्या चौथ्या अवतार नरसिंहाच्या अवताराची कहाणी सांगतो. प्रत्यक्षात नरसिंह हा अर्धा सिंह आणि अर्धा मानवाचा अवतार आहे. यासोबतच, चित्रपट प्रल्हादच्या अटळ भक्तीवरही लक्ष केंद्रित करतो. याशिवाय, 'महावतार नरसिंह'मध्ये वराह अवताराचा एक अनुक्रम देखील पाहायला मिळतो.