
भगवान विष्णूच्या दशावतार अॅनिमेटेड स्वरुपात प्रेक्षकांसमोर आणण्याचा निर्णय अश्विन कुमार यांनी घेतला आहे. यातील पहिला अवतार अर्थात नरसिंहावतार प्रेक्षकांच्या भेटीला आला असून या अॅनिमेटेडपटाने इतिहास रचला आहे. हा चित्रपट भारतातील सर्वाधिक कमाई करणारा अॅनिमेटेडपट बनला असून हा चित्रपट 100 कोटींची कमाई करण्याच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. 25 जुलै रोजी महावतार नरसिम्हा (Mahavatar Narsimha Release Date) चित्रपट संपूर्ण भारतात प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने सोमवारपर्यंत म्हणजेच 4 ऑगस्ट 2025 पर्यंत 91.25 कोटींची कमाई केली आहे. सैय्यारा चित्रपट 18 जुलै 2025 रोजी प्रदर्शित झाला होता. सैय्याराने बॉक्स ऑफीस कलेक्शनमध्ये (Saiyaara Movie Box Office Collection) 299 कोटींचा टप्पा ओलांडला आहे.
#MahavatarNarsimha [#Hindi version] is a BLOCKBUSTER... The film is trending far better than #Kantara #Hindi… In fact, #MahavatarNarsimha has nearly matched #Kantara's *4-week total* [₹ 69.75 cr] in *just 10 days* [₹ 65.64 cr]... Yes, you read that right!
— taran adarsh (@taran_adarsh) August 4, 2025
But that's not all –… pic.twitter.com/Ban1HcKs1X
महावतार नरसिम्हाशी 'धडक' फुसकी ठरली
25 जुलै रोजी प्रदर्शित झालेला महावतार नरसिम्हा चित्रपट कन्नड, हिंदी, तेलुगू, तमिळ आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटानंतर 1 ऑगस्ट रोजी धडक-2 (Dhadak 2 Movie Release Date) आणि सन ऑफ सरदार-2 (Son of Sardaar 2 Movie Release Date) हे दोन चित्रपट प्रदर्शित झाले होते, मात्र महावतार नरसिम्हापुढे या दोन्ही चित्रपटांची चमक फिकी पडल्याचे दिसते आहे. धडक-2 ने सोमवारपर्यंत 11.4 कोटींचा गल्ला जमवला आहे तर सन ऑफ सरदार-2 ने सोमवारपर्यंत 25.14 कोटींचा गल्ला जमवला आहे.
Roaring past records with divine force 🦁❤️🔥#MahavatarNarsimha crosses 105 CRORES+ GBOC India, setting the box office ablaze with unstoppable momentum.
— Hombale Films (@hombalefilms) August 4, 2025
A divine phenomenon awaits you in cinemas.#Mahavatar @hombalefilms @AshwinKleem @kleemproduction @VKiragandur @ChaluveG… pic.twitter.com/LbEdQBZyjo
हिंदी डब 'महावतार नरसिम्हा' ला चांगला प्रतिसाद
महावतार नरसिम्हा हा हिंदी भाषेतही डब करून प्रदर्शित करण्यात आला असून, हिंदी डब चित्रपटाने इतर भाषांच्या तुलनेत चांगली कामगिरी केली आहे. तेलुगू आणि कन्नडपेक्षाही हिंदी भाषेत डब केलेला महावतार नरसिम्हाने जास्त कमाई केली आहे.
( नक्की वाचा: नरसिंहाची बॉक्स ऑफिसवर डरकाळी! )
'महावतार नरसिम्हा' चित्रपटाची कहाणी काय आहे ?
भगवान विष्णूचा परमभक्त असलेला छोटा प्रल्हाद हा सतत विष्णूची आराधना करत असतो. त्याचे वडील हिरण्यकश्यपू यांना आपल्या मुलाने भगवान विष्णूची तपस्या, आराधना करणे आवडत नसते. यामुळे हिरण्यकश्यपू भक्त प्रल्हादाला ठार मारण्याचे प्रयत्न करतो, मात्र तो एकदाही यशस्वी होत नाही कारण स्वत: भगवान विष्णू त्याचे रक्षण करत असतात. अखेर हिरण्यकश्यपूला ठार मारण्यासाठी भवनाग विष्णूंना स्वत: यावे लागते. हिरण्यकश्यपूला लाभलेल्या विशिष्ट वरामुळे भगवान विष्णूंनी नरसिंहाचा अवतार धारण केला होता. ही सगळी कथा या चित्रपटाद्वारे पाहायला मिळते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world