Mahavatar Narsimha Movie: 'महावतार नरसिंह'ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड; तिसऱ्या वीकेंडमध्ये छप्परफाड कमाई

चित्रपट समीक्षकांच्या मते, 'महावतार नरसिंह'ची ही कामगिरी थक्क करणारी आहे आणि हा चित्रपट धीमा होण्याचे कोणतेही संकेत देत नाही.

जाहिरात
Read Time: 2 mins

Mahavatar Narsimha Movie : 'महावतार नरसिंह' या चित्रपटाचा हिंदी व्हर्जन बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत आहे. चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी नुकत्याच केलेल्या ट्वीटनुसार, या चित्रपटाने तिसऱ्या वीकेंडमध्ये कमावलेले पैसे पहिल्या आठवड्यातील कमाईपेक्षाही जास्त आहेत. महावतार नरसिंहच्या यशाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

तरण आदर्श यांनी ट्वीटमध्ये दिलेल्या आकडेवारीनुसार, 'महावतार नरसिंह'ने आपल्या तिसऱ्या वीकेंडमध्ये तब्बल 38.96 कोटी रुपयांची कमाई केली आहे. हा आकडा चित्रपटाच्या पहिल्या आठवड्यातील कमाई 32.63 कोटी रुपयांपेक्षा आणि दुसऱ्या वीकेंडच्या कमाई 35.23 कोटींपेक्षा जास्त आहे. याचा अर्थ, चित्रपट पाहणाऱ्यांची संख्या कमी होण्याऐवजी वाढत आहे.

(नक्की वाचा - Aaishvary Thackeray : बॉलिवूडमध्ये ठाकरे ब्रँडची एन्ट्री, अनुराग कश्यपच्या सिनेमातून बाळासाहेबांचा नातू करणार पदार्पण, पाहा Video)

चित्रपट समीक्षकांच्या मते, 'महावतार नरसिंह'ची ही कामगिरी थक्क करणारी आहे आणि हा चित्रपट धीमा होण्याचे कोणतेही संकेत देत नाही.

  • पहिला आठवडा : 32.63 कोटी रुपये
  • दुसरा आठवडा : 55.17 कोटी रुपये
  • तिसरा आठवडा : 38.96 कोटी रुपये
  • शुक्रवार: 5.27 कोटी रुपये
  • शनिवार: 16.28 कोटी रुपये
  • रविवार : 17.41 कोटी रुपये
  • एकूण कमाई : 126.76 कोटी रुपये

या चित्रपटाने केवळ 17 दिवसांत 126.76 कोटी रुपयांची कमाई केली आहे. हे आकडे देशभरातील अधिकृत आणि अद्ययावत माहितीवर आधारित आहेत. 'महावतार नरसिंह'ची ही यशस्वी कामगिरी पाहता हा चित्रपट 'ब्लॉकबस्टर' ठरला आहे, असे तरण आदर्श यांनी म्हटले आहे.