Akshaye Khanna : बॉलिवूड अभिनेता अक्षय खन्ना याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. अक्षयने 'धुरंधर' चित्रपटात साकारलेली रहमान डकैतची भूमिका चाहत्यांकडून पसंत केली जात आहे. मात्र नुकतीच एक हैराण करणारी बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अजय देवगन याच्या दृष्यम ३ चित्रपटातून अक्षय खन्ना बाहेर झाला आहे. मानधनातील वाढ हे यामागील कारण सांगितलं जात आहे. मात्र आता पॅनोरामा स्टुडिओचे निर्माते कुमार मंगत पाठक यांनी सांगितलं की, जयदीप अहलावत दृष्यम ३ मध्ये अक्षय खन्नाला रिप्लेस करतील. एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत मंगत यांनी सांगितलं, अक्षय खन्ना हा प्रोजेक्ट सोडत आहे, यामागे त्याची फी हे कारण आहे. ज्यावर तीन वेळा चर्चा झाली आहे.
अक्षय खन्नाला दृष्यम ३ मधून केलं रिप्लेस...
याशिवाय मंगतनी सांगितलं, अक्षयने फोन उचलणं बंद केलं आहे. ज्यामुळे त्याची प्रोडक्शन कंपनी अक्षय खन्नाला कायदेशीर नोटीस पाठविण्याची तयारी करीत आहे. अक्षय खन्नाने अचानक घेतलेल्या निर्णयामाते त्याने अधिक माहिती दिली आणि सांगितले की, दृश्यम ३ मधील अक्षय खन्ना साकारत असलेलं पात्र आयजी तरुण अहलावत याच्या हेअरस्टाइलबाबत अक्षय खन्नासोबत काही मतभेद होते.
अक्षय खन्नाने फोन उचलणं केलं बंद....
मंगतने पुढे सांगितलं, त्यांच्या टीमने अक्षय खन्नासोबतचा वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. मात्र अक्षयने कॉल उचलणं बंद केलं आहे. ज्यानंतर त्याला कायदेशीर नोटीस पाठविण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे. यापूर्वीही आलेल्या एक अहवालानुसार, छावा आणि धुरंधरच्या यशानंतर अक्षय खन्नाने आपली फी २१ कोटी रुपयांपर्यंत केली आहे.
दृष्यम ३ मध्ये अक्षय खन्नाकडून विगची मागणी...
अक्षय खन्नाने दृष्यम फ्रेंचाइज २०२२ मध्ये तरुण अहलावत याची भूमिका साकारली होती. बॉलिवूड हंगामाच्या बातमीनुसार, अक्षय खन्नाने दृष्यम ३ या चित्रपटात विगची मागणी केली होती.