जाहिरात

Akshaye Khanna : 'धुरंधर'च्या यशानंतर अक्षय खन्नाने खरंच घरात होम-हवन केला? व्हायरल फोटोचं सत्य आलं समोर

धुरंधर चित्रपटाच्या यशानंतर अक्षय खन्ना यांनी घरात होम-हवन केल्याचं सांगितलं जात होतं. अभिनेता अक्षय खन्ना यांच्या घरी पूजा करणारे गुरुजी शिवम म्हात्रे यांनी तीन दिवसांपूर्वी एक पोस्ट केली होती.

Akshaye Khanna : 'धुरंधर'च्या यशानंतर अक्षय खन्नाने खरंच घरात होम-हवन केला? व्हायरल फोटोचं सत्य आलं समोर

Akshaye Khanna Pooja Video : 'धुरंधर' चित्रपटाच्या यशानंतर एकच नाव चर्चेत आहे. ते म्हणजे अक्षय खन्ना. या चित्रपटात हिरोपेक्षाही व्हिलन उजवा ठरला आहे. अक्षय खन्नाने आपल्या अभिनयाच्या जोरावर चित्रपटातील बड्या बड्या अभिनेत्यांना मागे टाकलं. या चित्रपटाच्या यशादरम्यान काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये अक्षय खन्ना घरात होम-हवन करीत असताना दिसत आहे. यानंतर विविध प्रकारच्या पोस्ट व्हायरल होत आहेत. 

धुरंधर चित्रपटाच्या यशानंतर अक्षय खन्ना याने घरात होम-हवन केल्याचं सांगितलं जात होतं. त्यासंदर्भातील अनेक पोस्ट व्हायरल होत होते. अभिनेता अक्षय खन्ना याच्या घरी पूजा करणारे गुरुजी शिवम म्हात्रे यांनी तीन दिवसांपूर्वी एक पोस्ट केली होती. यामध्ये त्यांनी अक्षय खन्ना याच्या अलिबाग येथील घराची पूजा केल्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. यानंतर याचा संबंध धुरंधरशी लावला जात होता. अखेर याबाबत स्वत: गुरुजींनी मोठा खुलासा केला आहे. 

त्या पुजेचा आणि 'धुरंधर'च्या यशाचा काही संबंध आहे का? 

गुरुजी शिवम म्हात्रे यांनी पोस्टद्वारे मोठा खुलासा केला आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे, अक्षय खन्ना यांच्या घराची पूजा ऑगस्ट 2023 मध्येच झाली होती. याचा ‘धुरंधर' चित्रपटाशी काहीही संबंध नाही. कृपया सोशल मीडियावर चुकीची माहिती पसरवू नका. त्यामुळे अक्षय खन्ना सरांना वाईट वाटू शकतं. 

मी पोस्ट केलेले व्हिडिओ चुकीच्या पद्धतीने शेअर केले जात आहे. अशा चुकीच्या हेतुने केलेल्या पोस्टमुळे चुकीचा मेसेज पसरला जात आहे. त्यामुळे कृपया असं करू नका. या व्हिडिओच्या माध्यमातून मला सांगायचं आहे की, आपली धर्म आणि संस्कृती जपली पाहिजे. पूजा फक्त सामान्य लोकच करत नाहीत तर प्रसिद्ध सेलिब्रिटी देखील भक्ती आणि श्रद्धेने देवाची पूजा  करतात.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com