Mana Che Shlok Teaser: 'मनाचे श्लोक' सिनेमाचा भन्नाट टीझर रिलीज, नवी जोडी येतेय प्रेक्षकांच्या भेटीला

Mana Che Shlok Teaser: मनाचे श्लोक हा सिनेमाद्वारे मृण्मयी देशपांडे आणि राहुल पेठे ही नवी जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Mana Che Shlok Teaser: मनाचे श्लोक सिनेमा कधी होणार रिलीज?

Mana Che Shlok Teaser: 'मना'चे 'श्लोक' सिनेमाचा जबरदस्त टीझर रिलीज करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी सिनेमाचे पोस्टर प्रदर्शित झाले होते, तेव्हापासून प्रेक्षकांमध्ये सिनेमाबाबत उत्सुकता निर्माण झालीय. आता टीझर रिलीज होताच प्रेक्षक सिनेमाची आतुरतेने वाट पाहात आहेत. 

टीझरमध्ये आजच्या तरुण पिढीची नाती, त्यांचे विचार दाखवण्यात आले आहेत. मनवा आणि श्लोक ही दोन वेगवेगळी पात्रं विशेष आकर्षण ठरत आहेत. मनवा ही धाडसी आणि बिनधास्त मुलगी आहे, तर श्लोक हा शांत आणि समंजस मुलगा आहे. त्यांच्यातील संवाद सिनेमाबद्दलची उत्सुकता वाढवणारे आहेत. हे दोन भिन्न स्वभावाचे लोक जेव्हा एकत्र येतात, तेव्हा त्यांच्या प्रेमकथेत काय घडतं? हे जाणून घेण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत.

(नक्की वाचा: Thappa Film: एकाच सिनेमात दिसणार 7 लई भारी मराठी कलाकार, प्रेक्षकांना पाहायला मिळणार रहस्यमय कथा?)

मनाचे श्लोक सिनेमातील कलाकार

सिनेमामध्ये मृण्मयी देशपांडे, राहुल पेठे, पुष्कराज चिरपुटकर, सुव्रत जोशी, सिद्धार्थ मेनन, हरीश दुधाडे आणि करण परब असे कलाकार आहेत.

दिग्दर्शिका मृण्मयी देशपांडे म्हणते, "हा माझ्यासाठी खास चित्रपट आहे. माझ्या मनाजवळचाच हा चित्रपट आहे, असं म्हटलं तरी चालेल. मनवा आणि श्लोकचा हा प्रवास प्रेक्षकांच्या मनाला नक्कीच आवडेल."

Advertisement

प्रस्तुतकर्ते नितीन वैद्य म्हणतात,"हा चित्रपट प्रेक्षकांना एक वेगळा अनुभव देईल. मुळात हा एक कौटुंबिक चित्रपट असल्याने यातील व्यक्तिरेखा आपल्याच घरातील वाटतील."

निर्माते संजय दावरा म्हणाले, "या चित्रपट प्रेक्षकांना मनोरंजनच करेल, कथा, कलाकार, दिग्दर्शन अशा सगळ्याच गोष्टी खूप छान जुळून आल्या आहेत."

Advertisement

(नक्की वाचा:  Dashavatar Movie: दशावतार सिनेमाच्या निमित्ताने 3 दिग्गज पहिल्यांदाच एकत्र, रंगपूजा भैरवी गाणं रिलीज VIDEO)

‘मना'चे श्लोक' सिनेमा कधी होतोय रिलीज?

‘मना'चे श्लोक' हा चित्रपट 10 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. याचे लेखन आणि दिग्दर्शन मृण्मयी देशपांडे यांनी केले असून निर्माते श्रेयश जाधव आणि संजय दावरा आहेत. हा चित्रपट स्टारलाईट बॉक्स थिएटर्स आणि नितीन वैद्य प्रॉडक्शन्स यांच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येणार आहे.