Radhika Bhide New Song: सध्याचा देशभर गाजणारा आणि तरूणाईचा लाडका मराठमोळा आवाज म्हणजे 'मन धावतंया' फेम राधिका भिडे. राधिका भिडेने मराठमोळ्या सिनेमामध्ये पार्श्वगायिका म्हणून नव्या वाटचालीस सुरुवात केलीय. राधिकाने गायलेले पहिलेवहिले मराठी चित्रपट गीत "हो आई!" सध्या चांगलंच व्हायरल होतंय. 'उत्तर' या आगामी सिनेमाच्या प्रमोशन गाण्यात आई-मुलाच्या नात्यातील सुंदर केमिस्ट्री, गोड आपुलकी आणि 'तू आहेस म्हणून मी आहे' ही भावना सोप्या शब्दात आणि गोड चालीत उलगडली आहे. 'उत्तर' सिनेमाच्या टीजरने रसिकांची उत्सुकता वाढली असतानाच "हो आई..." हे गाणं ती आतुरता अधिकच वाढवणारं आहे.
या गाण्याचे बोल सिनेमाचे लेखक-दिग्दर्शक क्षितिज पटवर्धन यांचे असून यापूर्वी अमितराज–क्षितिज पटवर्धन या जोडीने 'मन धागा धागा जोडते नवा', 'माझ्या राजा रं, माझ्या शिवबा रं' आणि 'तुला जपणार आहे' यासारख्या सुपरहिट गाण्यांमुळे प्रेक्षकांच्या हृदयात घर केलं आहे. नात्यांचे बंध उलगडणारं, त्यांचं हळूवारपण जपणारं , अमितराज- क्षितिज पटवर्धन या जोडीचं 'हो आई!' हे नवं गाणं 'उत्तर' या चित्रपटाच्या निमित्ताने नुकतंच प्रसिद्ध करण्यात आलं आहे. आपल्या सर्वांच्याच मनातली आईबाबतची भावना व्यक्त करणारं राधिकाच्या सुमधूर सुरांनी सजलेलं तरल आणि संवेदनशील असं हे गाणं प्रत्येकाला आपल्या आईला 'थँक यू' म्हणण्याची संधी देणारं निश्चितच आहे.
झी स्टुडिओज आणि जॅकपॉट एंटरटेनमेंटची निर्मिती असलेल्या 'उत्तर' या चित्रपटात रेणुका शहाणे, अभिनय बेर्डे आणि ऋता दुर्गुळे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. झी स्टुडिओजचे उमेशकुमार बन्सल आणि बवेश जानवलेकर तसेच जॅकपॉट एंटरटेनमेंटचे मयूर हरदास आणि संपदा वाघ निर्माते असून येत्या 12 डिसेंबरला सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
(नक्की वाचा: Amol Kolhe News: छत्रपती संभाजी महाराजांनंतर अमोल कोल्हे साकारणार महात्मा फुलेंची भूमिका, मालिकेचे नाव काय?)
Mann Dhaavataya Tuzhyach Mag Fame Radhika Bhide Debut Playback Singer In Uttar Movie Ho Aai New Song Video Out
राधिका भिडेचे नवकोरे गाणं | Radhika Bhide New Song
राधिका भिडेला या गाण्यामुळे प्रचंड लोकप्रियता मिळाली
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world
