
Ansuman Vichare Viral Video: आपल्या विनोदी अभिनयाने आणि हजरजबाबीपणाने प्रेक्षकांना खळखळून हसवणारा मराठी अभिनेता म्हणजे अंशुमन विचारे. अनेक चित्रपट, नाटके, मालिकांमधून अंशुमन विचारेने आपली स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. आपल्या अभिनयासोबतच तो सोशल मीडियावरील पोस्टमुळेही नेहमी चर्चेत असतो. सध्या अंशुमनच्या एका व्हिडिओने नेटकऱ्यांना कोड्यात टाकलं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
अभिनेता अंशुमन विचारेने आपल्या पत्नीसोबत शेअर केलेला एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये तो दुसरे लग्न केल्याचा दावा करत आपल्या पत्नीची माफी मागताना दिसत आहे. त्याचा हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनीही जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. काय आहे हे नेमकं प्रकरण? जाणून घ्या...
अभिनेता अंशुमन विचारे या व्हायरल व्हिडिओमध्ये आपल्या पत्नीची माफी मागताना दिसत आहे. सगळ्यांसमोर मी माझ्या बायकोची जाहीर माफी मागतो. कारण, मी तिला अंधारात ठेऊन दुसरं लग्न केलं आणि दुसऱ्या बायकोला घरात घेऊन आलोय. त्यामुले ती अस्वस्थ झालीये, आणि चुकीचेच वागलोय मी. काल रात्री तिच्या स्वप्नात येऊन मी हे चुकीचं वागल्यामुळे खूप डिस्टर्ब झालोय. माझं वागणं चुकीचं आहे, त्यामुळे तुमच्या सगळ्यांसमोर मी तिची जाहीर माफी मागतो.. असं त्याने म्हटले आहे.
या व्हायरल व्हिडिओवर नेटकऱ्यांनीही जोरदार प्रतिक्रिया दिल्यात. काही जणांनी अशी स्वप्न पडतात, काही होत नाही, छान राहा, आनंदी रहा, असा सल्ला दिला आहे. तर काही नेटकऱ्यांनी खूप मार खाल्लेला दिसतोय, चांगलाच सुजलेला दिसतोय.. असे म्हणत अभिनेत्याची फिरकीही घेतली आहे. दरम्यान, अभिनेता अंशुमन विचारेने फु बाई फू, कॉमेडीची बुलेट ट्रेन, कानामागून आली.. अशा लोकप्रिय मालिकांमध्ये काम केले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world