किंग खानसोबत 1 चित्रपट, 50000 कोटींची मालकीन, श्रीमंतीत जुही चावलालाही मागे टाकलं, 'ती' मराठी अभिनेत्री कोण?

फक्त एका चित्रपटानंतर या मराठी अभिनेत्रीने चित्रपटसृष्टीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आणि ती बनली 50 हजार कोटींची मालकीन, वाचा इनसाईड स्टोरी..

जाहिरात
Read Time: 2 mins
Marathi Actress Gayatri Joshi Net Worth
मुंबई:

Swades Actress Gayatri Joshi: बॉलिवूडमध्ये अशा अनेक कलाकारांनी एन्ट्री मारली, ज्यांनी फार कमी काळातच या इंडस्ट्रीत छाप टाकली. पण काहींनी या झगमगत्या दुनियेला बायबाय करून आयुष्याची वेगळी वाट धरली.अशाच सेलिब्रिटींपैकी एक नाव त्या मराठी अभिनेत्रीचं आहे, जिने बॉलिवूडचा किंग शाहरुख खानसोबत डेब्यू केलं. पण फक्त एका चित्रपटानंतर या अभिनेत्रीने चित्रपटसृष्टीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. आज याच अभिनेत्रीचं नाव 50 हजार कोटी रुपयांच्या संपत्तीशी जोडलं गेलं आहे. कोण आहे ती मराठी अभिनेत्री? जाणून घेऊयात. 

अखेर ती मराठी अभिनेत्री कोण? 

गायत्री जोशी असं त्या मराठी अभिनेत्रीचं नाव आहे. ज्यांनी 2004 मध्ये आशुतोष गोवारिकर यांच्या ‘स्वदेस' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यावेळी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर खूप गाजला.तसच या चित्रपटाला ऑस्करचं नॉमिनेशनही मिळालं होतं. गायत्री यांच्या साधेपणाने आणि दमदार अभिनयाने त्यांना रातोरात प्रकाशझोतात आणलं. शाहरुख खानसोबत गायत्री जोशी यांनी केलेल्या अभिनयाचीही खूप चर्चा रंगली. 

नक्की वाचा >>Dharashiv Crime: दीर-भावजयच्या अनैतिक संबंधांना अडसर ठरलेल्या 13 वर्षीय मुलाची निर्घृण हत्या, शेतात काय घडलं?

गायत्री जोशी यांनी बॉलिवूड का सोडलं? 

फिल्म इंडस्ट्रीत जबरदस्त एन्ट्री झाल्यानंतरही गायत्री जोशी यांनी भविष्यात चित्रपटांमध्ये काम न करण्याचा निर्णय घेतला.‘स्वदेस'हा त्यांचा पहिलाच आणि शेवटचा चित्रपट ठरला. हा चित्रपट केवळ प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनला नाही, तर या चित्रपटाची भारताकडून ऑस्करसाठीही निवड झाली होती. चित्रपट रिलीज झाल्यानंतरच्या पुढच्या वर्षी म्हणजेच 2005 मध्ये त्यांनी उद्योगपती विकास ओबेरॉय यांच्याशी लग्न केलं आणि त्यानंतर बॉलिवूडला कायमचं बायबाय केलं. 

नक्की वाचा >> महिलांसाठी भारतातील सर्वात सुरक्षित अन् नोकरीसाठी चांगलं शहर कोणतं? पुणे-मुंबईसह टॉप-10 शहरांची लिस्ट वाचा

गायत्री जोशी कशा बनल्या श्रीमंत अभिनेत्रींपैकी एक?

गायत्री जोशी बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत अभिनेत्री नाहीत. पण इंडस्ट्रीतील सर्वात श्रीमंत अभिनेत्रींच्या यादीत त्यांचं नावाचा समावेश आहे. शाहरुख खानच्या ऑनस्क्रीन हिरोईनने आज रिअल लाइफमध्ये अतिशय आलिशान,स्थिर आणि यशस्वी जीवन उभारलं आहे.फक्त एका चित्रपटातून मिळालेल्या प्रसिद्धीनंतर त्यांनी ग्लॅमरस जग मागे सोडलं आणि उद्योगपतीच्या कुटुंबाचा एक भाग बनून वेगळं स्थान निर्माण केलं. 

Advertisement