ओमकार कुलकर्णी, प्रतिनिधी
Dharashiv Crime News Today : धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथे एक संतापजनक आणि अंगावर काटा आणणारी घटना उघडकीस आली आहे.दीर-भावजयच्या अनैतिक संबंधांला अडसर ठरणाऱ्या 13 वर्षीय मुलाचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना घडलीय. कुऱ्हाडीने वार करत या अल्पवयीन मुलाचा खून करण्यात आला. त्यानंतर त्याचा मृतदेह तामलवाडी येथील तलावाजवळ फेकून देण्यात आला.याप्रकरणी तामलवाडी पोलिसांनी 24 तासांतच खुनाचा उलगडा केला आणि आरोपीच्या मुसक्या आवळल्या. ओमकार देवीदास कांबळे असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. तर कृष्णा उर्फ सदानंद कांबळे असं खून झालेल्या मुलाचं नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गालगत तामलवाडी शिवारात कदम यांची शेती आहे. याच ठिकाणी आरोपी ओमकार कांबळे त्याची भावजय ज्योतीसोबत सालगडी म्हणून काम करत होता.ज्योतीचा मुलगा कृष्णा हा कधी वडिलांकडे तर कधी आईकडे राहत असे.कृष्णाला त्याची आई आणि चुलत भाऊ ओमकार यांच्यातील अनैतिक प्रेमसंबंध समजलं.त्यानंतर तो सतत त्याच्या वडिलांना याप्रकाराची माहिती देत असे. त्यामुळे आरोपी ओमकारच्या मनात त्याच्याविषयी तीव्र चीड निर्माण झाली होती.त्यामुळेच कृष्णा हा त्यांच्या प्रेमसंबंधांना अडसर ठरत असल्याचे आरोपीला वाटू लागले.
नक्की वाचा >> महिलांसाठी भारतातील सर्वात सुरक्षित अन् नोकरीसाठी चांगलं शहर कोणतं? पुणे-मुंबईसह टॉप-10 शहरांची लिस्ट वाचा
मृतदेह गवतात फेकला अन् आरोपीने..
त्यानंतर 1 जानेवारीला दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास आरोपी ओमकार कांबळेने विद्युत पंपाचा पाईप बसवण्याच्या कामाबाबत कृष्णाला सांगितलं. त्यानंतर कृष्णाला तामलवाडी तलावाजवळ नेले.त्यानंतर त्याने कुऱ्हाडीने वार करत कृष्णाचा खून केला.खून केल्यानंतर मृतदेह गवतामध्ये फेकून देऊन आरोपी घटनास्थळावरून पसार झाला. 5 जानेवारीला 4 वाजण्याच्या सुमारास तामलवाडी येथील धनाजी नेटके हे तलावाजवळ गुरांना चारा देत होते.
त्यावेळी त्यांना गवतात मृतदेहाचे पाय दिसले. त्यांनी तत्काळ तामलवाडी पोलिसांना याबाबत सांगितलं. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक गोकुळ ठाकूर यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा केला. शरीरावरील जखमा पाहता हा खून असल्याचे स्पष्ट झाले. सुरुवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आणि पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली.
नक्की वाचा >> समुद्राच्या मधोमध आहे Island, पुरुषांना या बेटावर नो एन्ट्री! फक्त स्त्रियाच का जातात? लाखो लोकांना माहित नाही
बसस्थानक परिसरात कृष्णा कांबळेचा शोध घेतला, त्यानंतर..
खुनाच्या तपासासाठी तामलवाडी पोलिसांनी प्रथम बसस्थानक परिसरात कृष्णा कांबळेचा शोध घेतला. त्यानंतर मोबाईल लोकेशन ट्रेस करत पोलिसांचे पथक तलमोड (ता. उमरगा) येथील टोलनाक्यापर्यंत पोहोचले. पुढे कोळसूर गावात जात असताना आरोपी ओमकार देवीदास कांबळेला ताब्यात घेण्यात आले. मंगळवारी रात्री त्याला तामलवाडी पोलीस ठाण्यात आणून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात आली. आरोपीला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world