जाहिरात

महिलांसाठी भारतातील सर्वात सुरक्षित अन् नोकरीसाठी चांगलं शहर कोणतं? पुणे-मुंबईसह टॉप-10 शहरांची लिस्ट वाचा

चेन्नई येथील अवतार या कंपनीने एक रिपोर्ट तयार केला आहे. कोणती शहरे महिलांसाठी सर्वाधिक मदतशीर, सुरक्षित आणि नोकरीची संधी उपलब्ध करून देणारी आहेत,याबाबत कंपनीने देशातील 125 शहरांचा आढावा घेतला.

महिलांसाठी भारतातील सर्वात सुरक्षित अन् नोकरीसाठी चांगलं शहर कोणतं? पुणे-मुंबईसह टॉप-10 शहरांची लिस्ट वाचा
Safest City In India For Women
मुंबई:

Best City In India For Women : चेन्नई येथील अवतार या कंपनीने एक रिपोर्ट तयार केला आहे. कोणती शहरे महिलांसाठी सर्वाधिक मदतशीर, सुरक्षित आणि नोकरीची संधी उपलब्ध करून देणारी आहेत,याबाबत कंपनीने देशातील 125 शहरांचा आढावा घेतला. तसच कोणत्या शहरात चांगली वातावरण निर्मिती आहे, या कंपनीच्या माध्यमातून घेण्यात आला. यामध्ये बंगळुरु शहराला सर्वाधिक 53.29 गुण मिळाल्याचं या रिपोर्टच्या माध्यमातून समोर आलं आहे. बंगळुरु शहराला भारताचं आयटी हबसुद्धा म्हणतात. 

या रिपोर्टमध्ये बंगळुरुला 2025 साठी भारतातील महिलांसाठी सर्वात उत्तम शहर म्हणून निवडले आहे.हा रिपोर्ट चेन्नई येथील अवतार कंपनीने तयार केला आहे. कोणती शहरे महिलांना सुरक्षा, नोकरी आणि अनुकूल वातावरणाच्या दृष्टीने सर्वाधिक साथ देतात, याबाबत कंपनीने देशातील 125 शहरांचे मूल्यांकन करून पाहिले.  या यादीत बेंगळुरूला सर्वाधिक 53.29 गुण मिळाले आहेत.तर दुसऱ्या क्रमांकावर चेन्नई, पुणे तिसऱ्या क्रमांकावर, हैदराबाद चौथ्या आणि मुंबईला या यादीत पाचवं स्थान मिळालं आहे.

2. चेन्नई (49.86)

3. पुणे (46.27)

4. हैदराबाद (46.04)

5. मुंबई (44.49)

नक्की वाचा >> समुद्राच्या मधोमध आहे Island, पुरुषांना या बेटावर नो एन्ट्री! फक्त स्त्रियाच का जातात? लाखो लोकांना माहित नाही

1. सामाजिक मदत

यामध्ये सुरक्षा,आरोग्य सुविधा,शिक्षण,दळण-वळणाच्या सुविधा आणि राहण्यायोग्य वातावरणाचा समावेश आहे.या गोष्टींमध्ये चेन्नई सर्वात पुढे आहे.

2. नोकरी आणि कंपन्यांची मदत

यामध्ये चांगल्या नोकरीच्या संधी, महिलांना समान संधी देणे आणि त्यांना कौशल्य प्रशिक्षण देणे यांचा विचार केला जातो. या क्षेत्रात बंगळुरू सर्वात पुढे आहे,कारण येथे मोठ्या कंपन्या आहेत आणि महिलांसाठी उत्तम धोरणे उपलब्ध आहेत. रिपोर्टनुसार, जे शहर दोन्ही गोष्टींमध्ये चांगलं आहे, तिथे महिला दिर्घकाळ करिअर बनवू शकतात.पुणे आणि हैदराबात दोन्ही शहरांमध्ये मोठा फरक आहे.दक्षिण भारतातील शहरं सर्वात चांगली राहिली आहे. त्यानंतर पश्चिम भारताचा नंबर येतो. मध्य आणि पूर्व भागातील शहरे नोकरीच्या संधीबाबत अजून मागे आहेत. 

नक्की वाचा >> Video: "32-34 वर्षांची मुलं लठ्ठ, टक्कल..",डॉक्टर मुलीसाठी वर शोधणारी आई होतेय प्रचंड ट्रोल, "तुमची मुलगीही.."

भारतातील टॉप 10 शहरांची लिस्ट 

  1. बंगळुरु
  2. चेन्नई
  3. पुणे
  4. हैदराबाद
  5. मुंबई
  6. गुरुग्राम
  7. कोलकाता
  8. अहमदाबाद
  9. तिरुवनंतपुरम
  10. कोयंबटूर

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com