Priya Bapat Andhera Web Series: कदमला दिलेली केस बंद होणार? प्रिया बापट दिसणार दमदार लेडी सिंघमच्या भूमिकेत

Priya Bapat Andhera Web Series News: मराठमोळी अभिनेत्री प्रिया बापट लवकरच नव्या हिंदी वेबसीरिजमध्ये झळकणार आहे. या सीरिजमध्ये ती पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Priya Bapat Andhera Web Series News: प्रिया बापटची नवी वेबसीरिज

Priya Bapat Andhera Web Series News: मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण करणारी, अभिनयाच्या विविध छटा साकारुन रसिकांचे मन जिंकणारी अभिनेत्री प्रिया बापट (Priya Bapat)आता एका नव्या आणि थरारक भूमिकेत दिसणार आहे. अमेझॉन प्राइमवर लवकरच रिलीज होणाऱ्या 'अंधेरा' (Andhera Web Series) या हॉरर सीरिजमध्ये ती एका महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे. नुकतेच या सीरिजचा ट्रेलर सोशल मीडियावर रिलीज करण्यात आला आहे. ट्रेलर पाहून प्रेक्षकांमध्ये एकाच वेळी भीती आणि सीरिजबाबत उत्सुकता देखील निर्माण केली आहे. या सीरिजमधून प्रियाने हॉरर जॉनरमध्ये पदार्पण केले असून यात ती पहिल्यांदाच पोलिसाची भूमिका साकारत आहे. तिच्या चाहत्यांसाठी ही एक आनंदाची बाब आहे. 

(नक्की वाचा: जानलेवा तेरी अदा! प्रिया बापटचा बोल्ड लुक VIRAL)

अंधेरा वेबसीरिजबाबत प्रिया बापटचा अनुभव कसा होता?

या अनुभवाबाबत प्रिया बापटने सांगितले की,"मी पहिल्यांदाच हॉरर जॉनरमध्ये काम करतेय आणि हा अनुभव खरोखरच वेगळा ठरला. खूप नाइट शिफ्ट्समध्ये शूटिंग केलं, पण स्क्रिप्ट इतके इंटरेस्टिंग होतं की काम करताना काहीच जाणवले नाही. जेव्हा हे स्क्रिप्ट मला मिळालं तेव्हा वाचून एकच विचार मनात आला, तो म्हणजे सध्या वाचलेल्या स्क्रिप्ट्सपैकी हे सर्वात उत्तम होतं. ही कथा फार वेगवेगळ्या पद्धतीने उलगडते आणि म्हणूनच ती अभिनयाच्या दृष्टीने खूपच आव्हानात्मक ठरली. यात अ‍ॅक्शन सीक्वेन्सेस आहेत, हॉरर सीन आहेत. त्यामुळे कलाकार म्हणून ही भूमिका करताना एक वेगळीच मजा आली. आतापर्यंत मी राजकारणी, वकील यांसारख्या विविध भूमिका साकारल्या आहेत. पण या सीरिजमध्ये मी एका पूर्णतः वेगळ्या प्रोफेशनमधून प्रेक्षकांसमोर येणार आहे. मराठीत मला जसे प्रेम मिळाले तसेच प्रेम मला हिंदी प्रोजेक्ट्ससाठीही मिळाले, याचा खूप आनंद आहे. आता हॉरर जॉनरमधून मी प्रेक्षकांचं मन कसं जिंकू शकेन, याचीच उत्सुकता लागली आहे. ट्रेलर प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहायला मी प्रचंड उत्सुक आहे. आशा आहे, प्रेक्षक या भूमिकेलाही तितकंच प्रेम देतील.''

Advertisement

(नक्की वाचा: Bin Lagnachi Goshta Teaser : ‘बिन लग्नाची गोष्ट' टीझर रिलीज; नात्यांच्या चौकटी मोडणाऱ्या गोष्टीचा हटके प्रवास)

प्रिया बापटच्या नव्या भूमिकेबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता

'अंधेरा' वेब सीरिजचं ट्रेलर पाहून प्रेक्षकांमध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. कथानक काय आहे? हे रहस्य नेमकं कुठं घेऊन जाणार आहे? मात्र या सर्व प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना लवकरच प्रेक्षकांना मिळणार आहेत. दुसरीकडे 'अंधेरा'ची ही थरारक झलक आणि प्रिया बापटचं हॉरर शैलीतील पदार्पण यामुळे ही सीरिज चर्चेचा विषय ठरतेय.