जाहिरात

Vishakha Subhedar: कुवेत ते मुंबई 700 किमीचा प्रवास आणि युद्धाची भीती; विशाखा सुभेदारचा मुलगा अखेर मायदेशी

Vishakha Subhedar Son Video: प्रसिद्ध मराठी अभिनेत्री विशाखा सुभेदार यांचा मुलगा अभिनय सुभेदार कुवेतमध्ये अडकल्यानंतर अखेर सुखरूप मायदेशी परतला आहे. वाचा अभिनय सुभेदारच्या परतीचा संपूर्ण भावुक प्रवास.

Vishakha Subhedar: कुवेत ते मुंबई 700 किमीचा प्रवास आणि युद्धाची भीती; विशाखा सुभेदारचा मुलगा अखेर मायदेशी
"Vishakha Subhedar Son Video: विशाखा सुभेदार यांचा मुलगा मायदेशीर परतला"
NDTV Marathi

Vishakha Subhedar Son News: आपल्या विनोदी शैलीने प्रेक्षकांना खळखळून हसवणारी महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री विशाखा सुभेदार यांचा मुलगा अभिनय सुभेदार अखेर सुरक्षितपणे मायदेशी परतला आहे. प्रदीर्घ काळानंतर आई-मुलाची भेट झाल्याने सुभेदार कुटुंब भावुक झाले आहे. अमेरिका, इस्राइल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे आखाती देशांमध्ये गंभीर स्थिती आहे. शेकडो मराठी नागरिक वेगवेगळ्या आखाती देशांमध्ये अडकले आहेत. याच नागरिकांमध्ये प्रसिद्ध अभिनेत्री विशाखा सुभेदार यांचा मुलगा अभिनय हा देखील होता. 

अभिनय सुभेदार हा कुवेतमार्गे लंडनला निघाला होता. कुवेतमध्ये त्याचा ट्रान्झिट थांबा होता. याच दरम्यान इराणने कुवेतवर ड्रोन आणि मिसाइल हल्ले सुरू केल्याने कुवेतचे हवाई क्षेत्र बंद करण्यात आले. विमान कंपन्यांनी अनिश्चित काळासाठी पुढील सर्व उड्डाणे रद्द केली. त्यामुळे अभिनय आणि त्यांच्यासह अन्य मराठी नागरिक कुवेतमध्ये अडकले होते. पुढे लंडनला जाणे किंवा मायदेशी परतणे यातील कोणतीच शक्यता दिसत नसताना युद्धाचीही झळ सोसण्याची भीती निर्माण झाली. कुवेतच्या आकाशात ड्रोन इंटरसेप्शनसारख्या घटना दिसू लागल्याने जीवाचा प्रश्न निर्माण झाला. 

अभिनेत्री विशाखा सुभेदार यांचा मुलगा मायदेशी दाखल

विशाखा सुभेदार यांनी व्हिडीओ केला होता शेअर | Vishakha Subhedar Video 

या संदर्भात अभिनेत्री विशाखा सुभेदार यांचा मदतीचा भावनिक व्हिडीओ सोशल मीडियावरून व्हायरल झाला. सुभेदार यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही मदतीची विनंती केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने दखल घेत सूत्रे हलवण्यास सुरुवात केली. मुख्यमंत्री कार्यालयाने वेगाने पावले उचलत विदेश मंत्रालयाशी संपर्क साधला. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विदेश मंत्रालयाच्या सातत्याने संपर्कात होते. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनाही मुख्यमंत्र्यांनी पाठपुरावा करण्यास सांगितले.

(नक्की वाचा: Salbardi Movie : 'सालबर्डी' चित्रपटात मराठमोळी पूजा सावंतचा धडाकेबाज लुक, 'या' तारखेला होणार प्रदर्शित)

अभिनय सुभेदारसह महाराष्ट्रातील 30 नागरिक मुंबईत दाखल | Abhinay Subhedar Video 

कुवेतमध्ये अडकलेल्या अभिनय सुभेदार आणि अन्य महाराष्ट्रीयन नागरिकांना रियाध (सौदी अरेबिया) येथून भारतात परत आणण्याचे नियोजन झाले. पण अभिनय सुभेदार यांच्यासह अनेकांच्या व्हिसाचा प्रश्न निर्माण झाला. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर विदेश मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी असीम महाजन यांनी अभिनय सुभेदार यांच्यासह काही जणांना सौदी अरेबियाचा व्हिसा मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला. त्यामुळे व्हिसा प्रक्रियेला गती मिळाली आणि अभिनय यांच्यासह अन्य 30 महाराष्ट्रीयन नागरिकांचा कुवेतहून रियाधला (सौदी अरेबिया) जाण्याचा मार्ग मोकळा झाला. सुमारे 700 किलोमीटर अंतराचा 10  तास प्रवास करून हे सर्व महाराष्ट्रातील नागरिक रस्ते मार्गाने रियाधला सुरक्षित पोहोचले.

यानंतर रियाधहून मुंबईकडे जाणाऱ्या फ्लाइटद्वारे त्यांच्या परतीचा प्रवास निश्चित करण्यात आला. यानंतर  अभिनय मंगळवारी (10 मार्च) पहाटे मुंबईत दाखल झाला आहे. या विमानातून अभिनय सुभेदार यांच्यासह महाराष्ट्रातील सुमारे 30 प्रवासी सुरक्षितपणे मुंबईत परतले आहेत. या संपूर्ण प्रक्रियेत कुवेत येथील भारतीय दूतावासाने आवश्यक सहकार्य केले.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com