Vachan Dile Tu Mala Serial: पहिली केस, मोठी जबाबदारी! ऊर्जाने प्रसिद्ध वकील उज्वल निकम यांचे आशीर्वाद घेतले

Vachan Dile Tu Mala Serial: ख्यातनाम सरकारी वकील उज्वल निकम यांच्या आशीर्वादाने अ‍ॅडव्होकेट ऊर्जा करणार पहिल्या केसची तयारी

जाहिरात
Read Time: 2 mins
"Vachan Dile Tu Mala Serial: कोर्टातला पहिला लढा कसा असणार?"
Vachan Dile Tu Mala Serial

Vachan Dile Tu Mala Serial: स्टार प्रवाहवर नुकतीच सुरू झालेली ‘वचन दिले तू मला' मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून मालिकेला भरभरून प्रेम मिळत आहे. न्यायासाठी लढणारी, ध्येयवेडी आणि आत्मविश्वासू अ‍ॅडव्होकेट ऊर्जा शिंदे तिच्या आयुष्यातील पहिली महत्त्वाची केस लढण्यासाठी सज्ज होत आहे. पहिली केस लढण्यापूर्वी ऊर्जाने प्रसिद्ध सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. न्यायाच्या वाटेवर पाऊल टाकताना ऊर्जासाठी ही भेट अतिशय महत्त्वाची ठरली. 

अनुष्का सरकटेची पहिली प्रतिक्रिया

या भेटीविषयी सांगताना ऊर्जाची भूमिका साकारणारी अभिनेत्री अनुष्का सरकटे म्हणाली,"उज्वल निकम सरांना भेटून मनापासून आनंद झाला. त्यांनी दिलेला वेळ, प्रेमळ शब्द आणि आशीर्वाद माझ्यासाठी खूप मोलाचे आहेत. हा क्षण मी कायम लक्षात ठेवेन अशी भावना अनुष्काने व्यक्त केली."

Photo Credit: Vachan Dile Tu Mala Serial

(नक्की वाचा: VIDEO: 'साडीत उंदीर, डासांचा त्रास...' बालगंधर्व रंगमंदिराची अशी दुरावस्था, मराठी अभिनेत्री प्रचंड संतापली)

खास बाब म्हणजे वकील हर्षवर्धन जहागिरदार यांच्या विरोधात ऊर्जा न्यायालयात उभी राहणार आहे. ऊर्जाचा ही पहिली केस केवळ एक खटला न राहता, न्यायासाठीचा एक निर्णायक संघर्ष ठरणार आहे. या संघर्षात ऊर्जा स्वतःला कशी सिद्ध करणार हे पाहण्यासाठी तुम्हाला वचन दिले तू मला ही मालिका पाहावी लागेल.