जाहिरात

मराठीतील टॉपच्या दिग्दर्शकाच्या लेकीला अभिनयापेक्षा स्वयंपाकाची आवड; गोवेकरांना आवडीने खाऊ घालतेय मासे

मात्र खूप कमी जण असतात जी आपली आवड आणि करिअर स्वत: निवडतात. ही कहाणी आहे मराठी आणि बॉलिवूड गाजवणाऱ्या एका दिग्दर्शकाच्या मुलीची.

मराठीतील टॉपच्या दिग्दर्शकाच्या लेकीला अभिनयापेक्षा स्वयंपाकाची आवड; गोवेकरांना आवडीने खाऊ घालतेय मासे

Marathi directors daughter unique career : सर्वसाधारणपणे डॉक्टरचा मुलगा डॉक्टर होतो, पोलिसांच्या मुलालाही पोलीस होण्याची इच्छा असते. सिनेमा क्षेत्रात तर अख्खं कुटुंबच्या कुटुंब अभिनय क्षेत्रात पदार्पण करतात. मात्र खूप कमी जण असतात जी आपली आवड आणि करिअर स्वत: निवडतात. ही कहाणी आहे मराठी आणि बॉलिवूड गाजवणाऱ्या एका दिग्दर्शकाच्या मुलीची. ज्येष्ठ दिग्दर्शकाची मुलगी अभिनय क्षेत्रात आली नाही तर तिने स्वत:ची वाट स्वत: निवडली. तिला स्वयंपाकाची आवड आहे. आज तिचं गोव्यात एक रेस्टॉरंट आहे. तिथं ती स्वत: स्वयंपाक करून गोवेकरांना माशांसह विविध कोकणी पदार्थ खाऊ घालते. 

कोण आहे हा दिग्दर्शक?

हा दिग्दर्शक आहे महेश मांजरेकर. महेश मांजरेकर मराठी आणि बॉलिवूडमधील मोठं नाव. त्यांनी अनेक हिट चित्रपट दिले. त्यांनी 'वास्तव', 'अस्तित्व', 'विरुद्ध...', 'मी शिवाजीराजे भोसले बोलतोय', 'शिक्षणाच्या आईचा घो', 'सिटी ऑफ गोल्ड', 'काकस्पर्श', 'शाळा', 'फक्त लढ म्हण', 'कोकणस्थ', 'नटसम्राट', 'जुनं फर्निचर...' सारख्या अनेक चित्रपटांची निर्मिती केली. त्यांची दुसरी पत्नी मेधा मांजरेकरही अभिनय क्षेत्रात सक्रिय आहे. दरम्यान महेश मांजरेकर यांची पहिली पत्नी दीपा मेहता यांच्यापासून त्यांना दोन मुलं आहेत. सत्या आणि अश्वामि. वडिलांचा वरदहस्त असतानाही दोघांनीही चित्रपट क्षेत्रात येणं टाळलं आणि स्वत:चं वेगळं करिअर सुरू केलं. 

अश्वामिला स्वयंपाकाची आवड...

अश्वामिला स्वयंपाकाची आवड आहे. ती गोव्यातील कलंगुट शहरात 'आमची' नावाने रेस्टॉरंट चालवते. मालवणी पद्धतीने बनवलेलं सी फूड खाण्यासाठी इथे खवय्यांची गर्दी असते. तिला स्वयंपाक करायला आणि ते खाऊ घालायला आवडतं. या रेस्टॉरंटमध्ये मालवणी प्रकारचे मासे, काळ्या वटाण्याटी उसळ, भरलेले मासे, हिरव्या मसाल्यातील मासे असं विविध प्रकारचे खाद्यपदार्थ मिळतात. विशेष म्हणजे सत्या मांजरेकर यांचा पहिला मुलगा गोरेगावमध्ये 'सुका सुखी' या नावाचं हॉटेल सांभाळतो. (Mahesh Manjrekar's daughters' restaurant)

खाण्याच्या शोधात अनेक रोड ट्रिप...

अश्वमिका हिने आपल्या सोशल मीडियावरुन बाबा महेश मांजरेकरांसोबतची आठवण शेअर केली आहे. यामध्ये ती म्हणते, माझे बाबा खाण्याबाबतीत खूप नेमके आहेत. अनेकदा चांगल्या खाद्यपदार्थांच्या शोधासाठी आम्ही अनेक रोड ट्रिप केल्या आहेत. बाबा खाण्याबद्दल बोलतात तेव्हा त्यांच्या डोळ्यात वेगळीच चमक असते. आणि माझ्याही. विशेषत: आजीच्या हातचं. आजीच्या आणि आमच्या कुटुंबाच्या रेसिपीज तुमच्यासाठी 'आमची' च्या माध्यमातून घेऊन आलो आहेत.  

Listen to the latest songs, only on JioSaavn.com