Dharmendra : २४ नोव्हेंबर २०२५ रोजी भारतातील एक हुरहुन्नरी कलाकार, चार्मिंग, हँडसम हंक धर्मेंद्र यांचं निधन झालं. त्यांची एग्झिट चाहत्यांना चटका लावणारी होती. त्यांच्या निधनानंतर धर्मेंद्र यांच्या आठवणींना उजाळा दिला जात आहे. धर्मेंद्र आणि सनी-बॉबी देओल यांच्या अनेक आठवणी सोशल मीडियावर शेअर केल्या जात आहेत.
दरम्यान बॉबी देओल आणि धर्मेंद्र यांची आठवण सांगणारा किस्सा समोर आला आहे. धर्मेंद्र यांचे सुपूत्र बॉबी देओल लहानपणी एका अभिनेत्रीच्या प्रेमात होते. त्या अभिनेत्रीचा फोटो बॉबी देओल आपल्या खिशात घेऊन फिरायचे. विशेष म्हणजे या अभिनेत्रीला धर्मेंद्र आवडायचे. धर्मेंद्र यांनी या अभिनेत्रीसोबत काम केलंय. देओल कुटुंबात ट्रायअँगल निर्माण करणारी ही अभिनेत्री कोण आहे?
बॉबी देओलचा लहानपणीचा क्रश कोण आहे?
त्या अभिनेत्रीचं नाव आहे जया बच्चन. धर्मेंद्र यांनी स्वत: बॉबी देओलला या अभिनेत्रीचा फोटो पाकिटात लपवून ठेवताना पाहिलं होतं, अशीही चर्चा आहे. News18 हिंदीने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे. त्यामध्ये दिलेल्या माहितीनुसार, बॉबी देओल याला जया बच्चन आवडायची. लहानवयात तो जया बच्चन यांचा फोटो आपल्या पाकिटात ठेवायचा.
बॉलिवूडचे हि-मॅन धर्मेंद्र यांच्या निधनानंतर संपूर्ण देशात शोक पसरला होता. आपल्या लाडक्या अभिनेत्याच्या निधनाने चाहत्यांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या. त्यात धर्मेंद्र यांचं शेवटचं दर्शनही चाहत्यांना घेता न आल्याने त्यांनी निराशा व्यक्त केली होती. नुकतच हेमा मालिनीने याबाबत खुलासा केलाय. आपल्याला कोणीही आजारी अशा अवस्थेत पाहू नये असं धर्मेंद्र यांना वाटत होतं. धर्मेंद्र यांचं वय झालं होतं, मात्र ते नेहमीच सार्वजनिक ठिकाणी स्ट्राँग राहिले.
नक्की वाचा - शब्दांच्या पलीकडले...! Dharmendra यांच्या निधनाच्या 8 दिवसांनी सनी आणि बॉबी देओल पहिल्यांदाच झाले व्यक्त
एका कार्यक्रमादरम्यान प्रभू चावला यांच्याशी झालेल्या बातचीतदरम्यान धर्मेंद्र म्हणाले होते, जया बच्चनसोबत त्यांनी अनेक चित्रपटात काम केलंय. मात्र एका चित्रपटासाठी त्यांच्या घरी जया बच्चन सोबत फोटोसेशन झालं होतं. त्यावेळी जया यांनी सांगितलं की, त्या माझ्या फॅन आहेत आणि माझा फोटो स्वत:जवळ ठेवायच्या. जया बच्चन यांनी अनेकदा धर्मेंद्र यांच्यासोबतच्या भेटीबाबत खुलासा केला आहे. धर्मेंद्रला जेव्हा त्या पहिल्यांदा भेटल्या तेव्हा जया घाबरुन सोफ्याच्या मागे लपल्या होत्या. तो किस्सा त्या अजूनही विसरल्या नाही.
धर्मेंद्र यांचे सुपूत्र बॉबी देओल यांना जया बच्चन प्रचंड आवडायच्या. स्वत: धर्मेंद्र यांनी सांगितलं होतं की, माझ्या घरात जर जया बच्चन यांचा सर्वात मोठा फॅन कोणी असेल तर तो बॉबी देओल. लहानपणी तो जया भादुरी यांचे चित्रपट पाहायचा. बॉबी देओल त्यांचा फोटो आपल्या पाकिटात ठेवायचा.