Sunny and Bobby Deol's first reaction 8 days after Dharmendra's death : बॉलिवूडचे सुपरस्टार, हिमॅन धर्मेंद्र यांचं २४ नोव्हेंबर २०२५ रोजी वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झालं. त्यांच्या निधनाला ८ दिवस पूर्ण झालेत. यानंतर पहिल्यांदाच देओल कुटुंबाकडून सोशल मीडियावर पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. धर्मेंद्र यांच्या एका भावुक करणाऱ्या व्हिडिओवर सनी देओल आणि बॉबी देओल, अभय देओल यांनी हृदयाला स्पर्श करणाची प्रतिक्रिया दिली आहे.
ब्यूटी फोटोग्राफर टीना देहल हिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर धर्मेंद्र यांचे तरुणपणाचे सुंदर फोटोंचा व्हिडिओ शेअर केला आहे. तिने कॅप्शनमध्ये लिहिलंय... या जादूसाठी धन्यवाद...इतक्या कमी वयात आम्हाला चित्रपटाच्या जगाची ओळख करून देण्यासाठी... ही जादू नेहमी जिवंत राहील... या पोस्टवर सनी देओलने लाल रंगाचे हार्ट इमोजी पाठवले आहेत. तर बॉबी देओल आणि अभय देओल या दोघांनाही हार्ट इमोजी शेअर करीत आपली भावना व्यक्त केली.

प्रार्थना सभेचा भावुक करणारा व्हिडिओ...
धर्मेंद्र यांच्या निधनाच्या तीन दिवसांनंतर देओल भावांनी मुंबईच्या ताज लँड्स अँड हॉटेलमध्ये प्रार्थना सभेचं आयोजन केलं होतं. यावेळी अनेकांनी हजेरी लावत श्रद्धांजली वाहिली. २७ नोव्हेंबर रोजी झालेल्या या सभेत चित्रपट क्षेत्रातील अनेक पिढीतील स्टार सामील झाले. आता सोशल मीडियावरील प्रार्थना सभेतील एक भावुक करणारा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
A very emotional video from #Dharmendra ji's prayer meet🥺
— Mr Prabh Deol (@Movie_flix1) November 30, 2025
Sonu Nigam is consoling Sunny deol and Bobby 🥀
Sunny sir loves his father very much, Seeing him cry brings tears to my eyes too 🥹
धर्मेंद्र जी, आप हमेशा हमारे दिलो में जिंदा रहोगे🙏🙏 om Shanti pic.twitter.com/JO9WuoGugC
ज्यामध्ये सोनू निगम हा सनी देओलचं सांत्वन करताना दिसत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world