Devkhel Web Series: 'देवखेळ' वेबसिरीजवर बंदी घाला, ठाकरेंच्या आमदाराची मागणी, 'त्या' चित्रणावरुन कोकणात रोष

गुहागर पोलिस ठाणे ते जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, असेही आमदार जाधव यांनी नमूद केले आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

 Devkhel Web Series: अभिनेता अंकुश चौधरी आणि अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी भूमिका साकारलेली देवखेळ या वेबसिरीजची सध्या जोरदार चर्चा होत आहे. ट्रेलर लाँच झाल्यापासून ही सिरीज वादाच्या भोवऱ्यात अडकली असून अनेक कोकणवासियांनी याला विरोध दर्शवला आहे. अशातच आता शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनीही देवसिरीज या वेबसिरीजवर बंदी घालण्याची मागणी केली आहे.

'देवखेळ' सिरीजवर बंदी घाला...

कोकणातील शिमगोत्सवातील पारंपरिक व पौराणिक लोकनृत्य पात्र संकासुराला क्रूर, अंधश्रद्धा पसरवणारा म्हणून दाखवल्याच्या आरोपावरून झी ५ या मराठी ओटीटीवर प्रसारित होत असलेल्या 'देवखेळ' या वेबसीरिजवर तत्काळ बंदी घालावी, अशी मागणी आमदार भास्कर जाधव यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांना निवेदन दिलं आहे. 

Advertisement

Ajit Pawar VIDEO: बायोपिक आला तर हिरो कोण? खुद्द अजितदादांनीच सुचवलं होतं 'या' अभिनेत्याचं नाव!

या निवेदनात आमदार जाधव यांनी म्हटलं आहे की, संकासूर हे कोकणातील शिमगा उत्सवातील एक भक्तिमय, पौराणिक व पारंपरिक पात्र आहे. त्याला शिवाचा अवतार मानलं जातं. काळ्या रंगाचा पोशाख, मुखवटा व हातात वेत घेऊन गोमूसोबत गावागावांत फिरणारा संकासूर गावकऱ्यांना आशीर्वाद देतो. ही केवळ करमणूक नसून कोकणची शेकडो वर्षांची श्रद्धा व सांस्कृतिक परंपरा आहे. मात्र ३० जानेवारीपासून  सुरू झालेल्या 'देवखेळ' या वेबसीरिजमध्ये संकासुराला खुनी व क्रूर प्रवृत्तीचे पात्र दाखवलं आहे. 

या मालिकेचे चित्रिकरण गुहागर तालुक्यात झालं असून संकासुरावर डॉक्युमेंटरी करत असल्याचे सांगून प्रत्यक्षात वेबसीरिजचे शूटिंग केल्याचा आरोपही केला आहे. या प्रकारामुळे संपूर्ण कोकणात संतापाचे वातावरण आहे. नमन मंडळे, भजन मंडळांतील कलाकार तसेच सर्वसामान्यांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. याबाबत गुहागर पोलिस ठाणे ते जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, असेही आमदार जाधव यांनी नमूद केले आहे.

VIDEO: 'दादांची आठवण उडत उडत पायाजवळ', तरुणीला घटनास्थळी सापडला 'असा' कागद; 80 लाख लोकांनी पाहिला व्हिडिओ